नाशिक – भाजपा प्रदेश अध्यक्ष आ.चंद्रकांत दादा पाटील हे १७ व १८ जुलै रोजी नाशिक दौऱ्यांवर येत आहेत अशी माहिती भाजपा शहराध्यक्ष गिरीष पालवे यांनी दिली आहे. पाटील यांचा दोन दिवशीय दौरा असा असणार आहे.
शनिवार १७ जुलै २०२१
सकाळी ७.३० ते ८.३० वा.- संघ समन्वय शाखा- शंकराचार्य संकुल, गंगापुर नाका, नाशिक, सकाळी ८.३० ते ९.३० वा.- संघ पदाधिकारी समवेत बैठक, सकाळी ९.३० ते १०.१५ वा.- राखीव वेळ, सकाळी १०.१५ ते ११ वा.-बैठक – महानगर पदाधिकारी (उपाध्यक्ष व चिटणीस),सकाळी ११ ते 1१२ वा.-व्यक्तीश: भेटी- महानगर अध्यक्ष, चार सरचिटणीस , दुपारी १२ ते १.३० वा.-व्यक्तीश: भेटी- दहा मंडल अध्यक्ष बैठक,दुपारी २.३० ते ३ वा.-राखीव वेळ,दुपारी ३ ते ५ वा.-वसंतस्मृती कार्यालय- मोर्चा, आघाडया व प्रकोष्ठ पदाधिकारी बैठक,दुपारी ५ ते ७ वा.-व्यक्तीश: भेटी- भाजपा वसंतस्मृती कार्यालय येथे प्रमुख पदाधिका-यांची बैठक घेणार आहे. त्यानंतर संध्या.७ ते ७.३० – माजी आमदार बाळासाहेब सानप यांचे निवासस्थानी भेट ते देणार आहे. रात्री.८.३० ते ९.३०-राखीव वेळ
रविवार १८ जुलै २०२१
सकाळी ९.४५ ते १०.३० वाजता महापौर सतिष कुलकर्णी,यांचे निवासस्थानी भेट,सकाळी १०.३०ते ११ वा.-राखीव वेळ,सकाळी ११ ते १२ वा.-पत्रकार परिषद,सकाळी १२ ते १२.३० वा.-राखीव वेळ,दुपारी १ ते ३ वा.-.प्रमुख पदाधिका-यांची एकत्रीत बैठक, दुपारी ३ ते ७ वा.-भाजपा ग्रामीण जिल्हा, पदाधिकारी समवेत चर्चा.,रात्री. ८ ते ९ वा.-राखीव वेळ,१९ जुलै रोजी-नियोजित जिल्हयात संघटनात्मक प्रवास असल्याचे पालवे यांनी सांगितले.
दौ-याची तयारी
त्यांच्या स्वागतासाठी आ.देवयानी फरांदे, बाळासाहेब सानप, गिरीष पालवे, आ.सीमा हिरे, आ.राहूल ढिकले, लक्ष्मण सावजी, विजय साने, प्रशांत जाधव, पवन भगुरकर, सुनिल केदार, जगन अण्णा पाटील तसेच महानगर दहाही मंडल अध्यक्ष विशेष तयारी करीत असल्याचे पालवे यांनी सांगितले.