अक्षय कोठावदे, पिंपळनेर
पिंपळनेर येथे भारतीय जनता पार्टी तर्फे पेट्रोल व डिझेल भाव वाढ कमी करण्याबाबत अप्पर तहसीलदार विनायक थविल यांना निवेदन देण्यात आले, निवेदनात म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने दिवाळीच्या पूर्वसंध्येला पेट्रोल वरील एक्साईज कर पाच रुपये प्रति लिटर तर डिझेल वरील एक्साईज कर दहा रुपये प्रति लिटर करून जनतेला मोठा दिलासा दिला, केंद्र सरकारने कर कपात केल्यामुळे एकूण करांचा परिणाम लक्षात घेता महाराष्ट्रात प्रत्यक्षात पेट्रोल सहा रुपये व डिझेल बारा रुपये स्वस्त झाले आहे.
मोदी सरकारने ज्या प्रकारे पेट्रोल डिझेलवरील करात कपात करून जनतेला दिला त्याच प्रकारे राज्यातील महा विकास आघाडी सरकारने ही करात कपात करून जनतेला दिलासा दिला पाहिजे, अशी भारतीय जनता पार्टी तर्फे मागणी करण्यात आली आपल्या महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी सातत्याने पेट्रोल व डिझेल दरवाढीच्या विरोधात आंदोलने केली होती, आता मोदी सरकारने पेट्रोल डिझेलच्या दरात मोठा दिलासा दिल्यानंतर आपल्या आघाडी सरकारने ही कर कपात करून आपल्या वतीने अधिक मदत केली पाहिजे ही जनतेच्या स्वाभाविक अपेक्षा आहेत तथापि अजूनही आपल्या सरकारकडून टाळाटाळ होत असल्याने आघाडी सरकारातील घटक पक्षांची आंदोलने म्हणजेच केवळ राजकीय मतलबीपणा होता हे स्पष्ट झाले आहे भाजपशासित राज्यांनी नागरिकांना दरात कपात करून अधिकची सवलत दिली पण महाराष्ट्राने दिलेली नाही असेही निवेदनात म्हटले आहे की,
राज्यात डिझेलवर २४ टक्के व्हॅट आकारला जातो आणि पेट्रोल वर २५ टक्के व्हॅट आकारला जातो त्या अखेरीस पेट्रोलवर प्रति लिटर ९ रुपये असेही आहे यामध्ये दुष्काळासाठी लागू केलेल्या तीन रुपये प्रति लिटरलिटर सेसचा समावेश आहेराज्य सरकारला पेट्रोल-डिझेल वर करापोटी ३० ते ४० रुपये प्रतिलिटर मिळतात असे निवेदनात नमूद केले आहे. यावेळी भाजपा पिंपळनेर मंडळ अध्यक्ष इंजि. मोहन सूर्यवंशी, भाजपा शहरअध्यक्ष नितीन कोतकर, पंचायत समिति सदस्य देवेंद्र गांगुर्डे, प्रतीक कोतकर, राजेंद्र पगारे, विलास मोरे, अनिल जाधव, प्रमोद गांगुर्डे, सौरव कोठावदे, गणेश खैरनार, संजय कोठावदे, सुरेश पाटील, चेतन पगारे, प्रदीप कोठावदे, रामकृष्ण एखंडे, पंकज भावसार, हेमराज दशपुते, रवी भावसार, गोटू धामणे, आदी पदाधिकारी उपस्थित होते व भारतीय जनता पार्टी तर्फे अशीही मागणी करण्यात आली की आपल्या सरकारने पेट्रोल व डिझेल वरील व्हॅट कमी करून मोदी सरकार प्रमाणे पेट्रोल साठी पाच रुपये तर डिझेल साठी दहा रुपये सवलत द्यावी तसेच राज्यात दुष्काळी स्थिती नाही त्यामुळे पेट्रोल वरील प्रति लिटर तीन रुपये दुष्काळी सेस ताबडतोब रद्द करावा ही कपात व्हॅट कमी केल्यामुळे मिळणाऱ्या सवलती शिवाय अतिरिक्त असावी अशी मागणी करण्यात आली.