नाशिक – नाशिक शहराचा बहुप्रतिक्षित न्यू मेट्रो प्रकल्प लवकरात लवकर सुरू करण्यासाठी आपल्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करावी व नाशिक मुंबई एक्सप्रेसवे तयार करावा अशी मागणी आमदार देवयानी फरांदे यांनी नाशिक येथे दौऱ्यासाठी आलेल्या केंद्रीय रस्ते व दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन केली. नाशिक मेट्रो संदर्भात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नाशिक नियर मेट्रोची घोषणा केंद्रीय वित्त मंत्री यांनी २०२१-२२ चे अंदाजपत्रक सादर करताना केली होती. त्यानंतर राज्य शासनाने देखील या प्रकल्पाला मंजुरी दिलेली आहे, असे असताना देखील सदर प्रकल्प सुरू होण्यास विलंब होत असल्याबद्दल खेद व्यक्त करताना नितीन गडकरी यांनी त्यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करून प्रकल्पाला वेग द्यावा अशी मागणी आमदार फरांदे यांनी केले. या निवेदनात पुढे म्हटले आहे की, नाशिक ते मुंबई १८० किलोमीटर असताना प्रवाशांसाठी साडेचार ते पाच तासांचा वेळ लागतो कधी कधी तर हे अंतर सात तास या प्रवासासाठी निघून जातात तसेच या रस्त्याला अनेक ठिकाणी खड्डे पडलेले असल्यामुळे नाशिक मुंबई रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्याची मागणी आ. फरांदे यांनी केली.