इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
सिंधुदुर्ग भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी कुडाळ नगरपंचायत मधल्या सहा नगरसेवकांचे निलंबन केले आहे. पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. या कारवाईचे पत्र त्यांनी थेट जिल्हाधिकारी यांना देण्यात आल्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. या कारवाईनंतर शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांनी प्रत्त्युत्तर दिले आहे.
त्यांनी सोशल मीडियावर टाकलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, मीडियाच्या माध्यमातून दिसतंय की सिंधुदुर्ग भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी माझ्या मतदारसंघात म्हणजे कुडाळ नगरपंचायत मधल्या सहा नगरसेवकांचे निलंबन केले आहे. आम्हाला ज्या दिवशी खासदार नारायण राणे सांगतील त्या दिवशी हे निलंबन मान्य करू. सिंधुदुर्गात भाजपच निर्णय हे खासदार राणे साहेब घेत असतात म्हणून या पत्राला आम्ही किंमत देत नाही.