मुंबई – केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक केल्यानंतर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी अटकेवर प्रतिक्रिया दिली आहे. राणे यांना अटक घटनात्मक मूल्यांचे उल्लंघन असल्याचे त्यांनी म्हटले आहे. अशा कृतीमुळे आम्ही घाबरणार नाही किंवा दडपणार नाही असेही त्यांनी सांगितले आहे. त्याचप्रमाणे आम्ही लोकशाही पद्धतीने लढत राहू, ही यात्रा सुरुच राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्यांनी या प्रतिक्रियेचा ट्विटही केला आहे.
https://twitter.com/JPNadda/status/1430123034602442762?s=20