मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – खेळण्यांच्या दर्जाचे उल्लंघन केल्याबाबत प्राप्त झालेल्या तक्रारीवरुन (क्यूसीओ), भारतीय मानक ब्युरोच्या मुंबई शाखा कार्यालय-I अधिकाऱ्यांच्या पथकाने, मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या, टर्मिनल-२ इथल्या डोमॅस्टिक डिपार्चर हॉल, कोकोकार्ट कॅफे इथे छापा घातला.
कंपनीने सॉफ्ट टॉईजसह येणाऱ्या किंडर जॉय चॉकलेट टी (४x३) १५० जीएमची आयात केल्याचे छाप्या दरम्यान आढळले. खेळणी गुणवत्ता नियंत्रण आदेशानुसार (क्यूसीओ) सर्व खेळणी आयएस ९८७३-भाग १ नुसार बीआयएस प्रमाणित असावीत, त्यांच्याकडे वैध मानक चिन्ह असावे तसेच त्यावर बीआयएस परवाना क्रमांक असायला हवा. शोधसत्र आणि जप्ती दरम्यान सापडलेली सॉफ्ट खेळणी आयएस ९८७३ नुसार बीआयएस प्रमाणित नव्हती. हे खेळणी गुणवत्ता नियंत्रण आदेशाचे उल्लंघन आहे. धाडसत्रा दरम्यान सापडलेली अशी २०१ खेळणी जप्त करण्यात आली आणि चलन बिलांच्या प्रती जमा करण्यात आल्या. यावरुन ही खेळणी विकण्यात कंपनीचा सहभाग असल्याचे सूचित होते. बीआयएस कायदा २०१६ च्या कलम १७(१) चे हे उल्लंघन आहे. या गुन्ह्यासाठी न्यायालयात खटला दाखल करण्याची कारवाई सुरु करण्यात आली आहे.
प्रमाणित चिन्ह, वैध परवाना नसेल तर कोणतीही व्यक्ती बीआयएस कायदा – २०१६ नुसार, अशा कोणत्याही वस्तूंचे उत्पादन, आयात, वितरण, विक्री, भाड्याने देणे, साठवणूक करणे किंवा विक्रीसाठी प्रदर्शन करणे आदी करू शकत नाही. अशा परवाना धारक विक्रेते इत्यादींच्या दंड आणि दायित्वांसाठी नागरीक पुढील लिंकच्या सहाय्याने कायदा-२०१६ पाहू शकतात. (https://www.bis.gov.in/wp-content/uploads/2020/12/BIS-Act-2016.pdf ) .
क्यूसीओ आदेशाचे उल्लंघन केल्यास बीआयएस कायदा २०१६ नुसार दोन वर्षांपर्यंत कारावास किंवा किमान २,००,००० रुपये दंड किंवा दोन्ही अशी शिक्षा आहे. म्हणून, सर्व ग्राहकांना बीआयएस केअर अॅप वापरण्यास प्रोत्साहन दिले जाते (मोबाईल अँड्रॉइड + आयओएस दोन्हीमध्ये उपलब्ध). तसेच खरेदी करण्यापूर्वी, बीआयएस संकेतस्थळावर http://www.bis.gov.in भेट देऊन उत्पादनावर आयएसआय चिन्हाची सत्यता पडताळून पाहण्याची विनंती केली जाते. प्रचंड नफा कमावण्यासाठी बनावट आयएसआय चिन्हांकित उत्पादने तयार करून ग्राहकांना विकली जात असल्याचे अनेक वेळा निदर्शनास आले आहे.
कोणत्याही उत्पादनावर आयएसआय चिन्हाचा गैरवापर केल्याचे आढळल्यास, प्रमुख, एमयूबीओ-II, पश्चिम विभागीय कार्यालय बीआयएस, दुसरा मजला, एनटीएच(डब्लूआर), एफ-10, एमआयडीसी, अंधेरी (पूर्व), मुंबई – 400093 यांना कळवावे अशी नागरिकांना विनंती आहे. hmubo2@bis.gov.in यावर ई-मेलद्वारेही अशी तक्रार नोंदवता येतील. अशा माहितीचा स्रोत गोपनीय ठेवला जाईल.