मुंबई (इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क) – पक्षी एका देशातून दुसऱ्या देशात स्थलांतर करतात. हा निसर्ग नियम आहे. पाणी आणि भक्ष्याच्या शोधात पक्षी नियमित स्थलांतर करीत असतात. उत्तरेकडील सैबेरियामधून थेट भारतात अनेक पक्षी हिवाळ्यात दाखल होत असतात. पक्ष्यांच्या या भ्रमंतीचा तंत्रज्ञानाच्या माध्यमातून भन्नाट वेध घेण्यात आला आहे. जीपीएस आणि उपग्रह यांच्याद्वारे पक्ष्यांच्या स्थलांतराचे अफलातून चित्र उलगडले आहे. ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ इरिक सोल्हेम यांनी हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. युरोपातील पक्ष्यांच्या स्थलांतराचा हा व्हिडिओ आहे. याद्वारेच आपल्याला एक लक्षात येते की, संपूर्ण जग हे एकमेकाशी कशा पद्धतीने जोडलेले आहे, असे सोल्हेम यांनी म्हटले आहे. हे सर्व दाखविणारा हा अफलातून व्हिडिओ बघा
https://twitter.com/ErikSolheim/status/1480093484681940997?s=20