इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – बिपरजॉय चक्रीवादळ आता आणखी तीव्र झाले आहे. कोकण किनारपट्टी पासून पुढे सरकत हे वादळ गुजरात मध्ये धडकले होते, सौराष्ट्र-कच्छ किनारपट्टीवरील मांडवी-जखाऊ बंदराजवळ जात या वादळाने गुजरात मधील द्वारका किनारपट्टी लगत मोठे नुकसान केले होते. आता हे वादळ राजस्थान मध्ये धडकले असून येथे मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे राजस्थान सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून हजारो नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.
सर्व यंत्रणा तैनात
बिपरजॉय चक्रीवादळहे दीर्घकाळ टिकणारे व शक्तिशाली असून समुद्रातून ते आता जमिनीवर आले. २०२३ च्या उत्तर हिंद महासागर चक्रीवादळ हंगामातील हे दुसरे चक्रीवादळ आहे. बिपरजॉय एका कमी दाबातून उद्भवले होते. हे चक्रीवादळ तीव्र होण्यापूर्वी ६ जून २०२३ रोजी भारतीय हवामान खात्याने प्रथम अंदाज नोंदवले होते. बिपरजॉयने ईशान्येकडे वेग वाढवला. आता पश्चिम राजस्थानमध्ये सक्रिय झाले आहे. या चक्रीवादळामुळं बाडमेर आणि जालोर जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे. गेल्या २४ तासांपासून बाडमेरमध्ये पाऊस पडत आहे. या मुसळधार पावसामुळे रस्त्यावर पाणी तुंबले आहे. काल रात्रीपासून बिपरजॉय वादळाने ताशी ५० ते ६० किलोमीटर वेगाने जोरदार वारे वाहत आहेत. खबरदारी म्हणून बाडमेर व जालोरमधील ५ हजार नागरिकांना सुरक्षीतस्थळी हलवण्यात आले आहे. भारत सरकारतर्फे नुकसान रोखण्यासाठी शक्य तेवढे सगळे प्रयत्न सुरु आहे. भारतीय लष्कर, एनडीआरएफसह सर्व यंत्रणा तैनात करण्यात आल्या आहेत. केंद्र सरकारचे मंत्रीही या वादळावर लक्ष ठेवून आहे. गेल्या काही दशकांत अरबी समुद्राचं तापमान सातत्याने वाढत असल्याचे भारतीय हवामान विभागाच्या अहवालात म्हटले होते. जागतिक तापमानवाढीमुळे अशी प्रचंड वादळे होत असल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.
रेड अलर्ट जारी
गेल्या गुजरातमध्ये चक्रीवादळाने धुमाकुळ घातला होता. त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री भुपेंद्र पटेल यांनी चक्रीवादळाला तोंड देण्यासाठी सर्व तयारी करून त्याचा आढावा घेतला होता. कच्छ, जामनगर, मोरबी, राजकोट, देवभूमि द्वारका, जुनागढ, पोरबंदर आणि गिर सोमनाथ येथील किनारपट्टीच्या भागातून एक लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले होते. तसेच बखासरमध्ये सर्वप्रथम बिपरजॉयचा प्रभाव दिसून आला आहे. त्यानंतर शेवडा, बखासर, धनाळ, चौथण, धोरिमाण्णा येथे मुसळधार पाऊस झाला. बारमेर जिल्ह्यात रेड अलर्ट जारी केला होता. एसडीआरएफची टीम तैनात करण्यात आली होती. आता राजस्थान प्रशासनाकडून देखील एसडीआरएफ, लष्करासह विविध मदत आणि बचाव पथके तैनात करण्यात आली आहेत.
गेल्या दोन दिवसांपासून संततधार पाऊस व वारा यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत. बिपरजॉय वादळामुळे राजस्थानमध्ये अनेक ठिकाणी विजेचे खांब कोसळले आहेत. सुमारे १०० गावांमध्ये वीजपुरवठा खंडीत करण्यात आला आहे. राज्यातील सिरोही, पाली, जैसलमेर आणि जोधपूर जिल्ह्यात चक्रीवादळ बिपरजॉयचा कमी प्रभाव दिसत आहे. मात्र, या भागात अधूनमधून पाऊस पडत आहे. माउंट अबू, बाडमेरच्या सेवदा, माउंट , जालोर – राणीवाडा, चुरू – बिदासरा, रेवदार, सांचोरे मध्ये सुमारे २००ते ५० मिमी पाऊस पडला आहे.