विशेष प्रतिनिधी, मुंबई
बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बासू तिच्या बोल्डनेसमुळे नेहमीच चर्चेत असते. तिच्या कौटुंबिक जीवनाविषयी फार काही समोर येत नाही. तिला दोन लहान बहिणी आहेत. या दोघी तशा प्रसारमाध्यमांपासून लांब असतात. पण बिपाशा प्रमाणेच त्यादेखील बोल्ड आहेत. तिच्या बहिणींची नावे विजेयता आणि विदिशा अशी आहेत.
विजेयता ही सर्वात छोटी बहीण आहे. त्यामुळे घरात ती सर्वांची खूप लाडकी आहे. बिपाशा आणि तिच्यात खूप चांगले नाते आहे. प्रसिद्धीपासून ती दूर राहत असली तरी सोशल मीडियावर ती ऍक्टिव्ह असल्याने तिची जादू तेथे नक्कीच दिसते.
आपल्या मैत्रिणींसोबतचे किंवा बहिणींसोबतचे फोटो विजेयता नेहमीच शेअर करत असते. आणि त्याला चिक्कार लाईक्स देखील मिळतात. गेल्याच वर्षी विजेयताने आपला प्रियकर कारण तलरेजाशी लग्न केले. साधेपणाने झालेल्या या लग्नात बिपाशा आपले पती कारण सिंह ग्रोवरसोबत हजर होती. सध्या विजेयता लग्नानंतरचे जीवन एन्जॉय करत आहे.