नवी दिल्ली – अमेरिकन वाहन निर्मिती कंपनी टेस्ला चे सीईओ एलन मस्क टि्वटरवर नेहमीच सक्रीय असतात. आपल्या वेगवेगळ्या गाड्यांचे अपडेट्स ते गाडी प्रेमींना सातत्याने देत असतात. नुकत्याच टि्वटरवर दिलेल्या एका उत्तराने मस्क पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.
मस्क यांना एका टि्वटर युझरने विचारले की, टेस्ला मॉडेल ३ आणि मॉडेल वाय इलेक्ट्रिक गाड्यांसाठी ली- आयन १२ वी बॅटरी मिळेल का? त्यावर टेस्ला साठी जे जे सर्वाेत्तम आहे, ते देण्याचा आमचा प्रयत्न असेल, असे मस्क यांनी सांगितले. पण हे सांगतानाच अन्य वाहन उत्पादक कंपन्यांना चिमटा काढायला ते विसरत नाहीत. इतर कंपन्यांप्रमाणे फायदा मिळवणे हे आमचे ध्येय नाही. कारण, जे बेस्ट असतात, त्यांना कोणत्याही शिफारसीची गरज लागत नाही. जे बेस्ट असतात, ते कोणत्याही क्रमवारीत नसतात.
टेस्ला या वर्षाच्या अखेरीपर्यंत भारतात आपली पहिली ईव्ही गाडी लाँच करणार आहे. याची जोरदार तयारी कंपनीने केली आहे. एवढी की या गाडीतील इन्फोटेन्मेंट सिस्टीममध्ये हिंदी भाषेतील सूचना आहेत. या इन्फोटेनमेंट सिस्टीममधील हिंदी स्क्रीन शॉट सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
इतर अनेक कंपन्यांप्रमाणे टेस्लाने देखील इलेक्ट्रीक वाहनांवरील आयात शुल्क कमी करण्याची मागणी केली आहे. यापूर्वीही ही मागणी अनेक कंपन्यांनी केली आहे. मात्र, देशातील प्रतिस्पर्ध्यांमुळेच त्यांना यात यश आलेले नाही. आणि त्यामुळे आयात शुल्कही अजून तसेच आहे.