अजय सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त मनमाड शहरात आरपीएफ विभागातर्फे जनजागृतीसाठी बाईक (बुलेट) रॅली काढण्यात आली.
आझादीका अमृत महोत्सव निमित्त भुसावळ विभागीय सुरक्षा आयुक्त आरपीएफ क्षितीज गुरव यांच्या निर्देशानुसार सहायक सुरक्षा आयुक्तबी.पी. कुशवाह, निरीक्षक RPF प्रवासी सुरक्षा भुसावळ बैनी प्रसाद मीना यांच्या मार्गदर्शनाखाली एकूण १२ कर्मचाऱ्यांसह दुचाकी बुलेट भुसावळ येथून रॅली मनमाड रेल्वे स्थानकावर आली, तिचे स्वागत मनमाड रेल्वे स्टेशन मास्टर नागेश्वर यादव, जीआरपी पीआय शरद जोगदंड, शहर पोलीस एपीआय प्रल्हाद गीते, आरपीएफ उपनिरीक्षक समाधान वाहुळकर, उपनिरीक्षक बी.बी. श्रीवास यांच्यासह सर्व कर्मचारी यांची मनमाड स्थानकावर सर्व विभागांची समन्वय बैठक घेऊन मनमाड रेल्वे स्थानकावर रॅली काढून मनमाड शहरात जनजागृतीसाठी बाईक (बुलेट) रॅली काढण्यात आली. बाईक रॅलीमध्ये रेल्वेमध्ये होणाऱ्या गुन्ह्यांसाठी रेल्वे प्रवासी आणि सामान्य जनतेला योग्य कारणाशिवाय चालत्या ट्रेनची साखळी न ओढणे, रेल्वे रूळ ओलांडणे, रेल्वे लेव्हल क्रॉसिंग गेट न ओलांडणे अशा गुन्ह्यांची शिक्षा दिली जाते. अनोळखी व्यक्तींचे अन्न न खाणे, वस्तू न घेणे, चालत्या गाड्यांमध्ये चढू नये, उतरू नये, चालत्या ट्रेनवर दगडफेक करू नये, प्रवासादरम्यान सामानाची काळजी घेणे, विषबाधा याविषयी जनजागृती करण्यात आली.