इंडिया दर्पण ऑनलाई डेस्क – आजच्या काळात मुलांबरोबर मुलींनाही शिक्षणाची संधी मिळाल्याने केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर बिहार सारख्या राज्यातही शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षणात मुलींचे प्रमाण वाढले आहे. परंतु अनेक शाळांमध्ये सोयी सुविधांचा अभाव दिसून येतो. बिहारमध्ये तर अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना बसण्यास बाक नाही, तर काही शाळांमध्ये प्रसाधनगृहाची देखील व्यवस्था नाही, अशाच एका शाळेमध्ये सोयी सुविधांचा अभाव असल्याने शालेय मुली तथा विद्यार्थिनींनी या संदर्भात वरिष्ठांकडे तक्रार केली होती .मात्र त्याची कुणीही दखल घेतली नाही, त्यामुळे या मुली संतप्त झाल्या आणि त्यांनी चक्क शिक्षणाधिकाऱ्यांच्या वाहनावरच दगडफेक करीत वाहनावर हल्ला केला.
मुली थेट भिडल्या
बिहारमधील वैशाली जिल्ह्यातील एका सरकारी शाळेतील विद्यार्थिनींनी शाळेत बसण्याची योग्य व्यवस्था तसेच इतर मूलभूत सुविधांच्या अभावा विरोधात मुलींनी संताप व्यक्त केला. संतप्त विद्यार्थिनींनी आधी शाळेसमोरचा राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला. शाळा प्रशासना विरोधातही त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. त्यामुळे या ठिकाणी मोठा गोंधळ उडाला, या घटनेची माहिती मिळताच, महिला पोलीस अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी महिला पोलीस अधिकाऱ्यांनी मारहाण केल्याचा आरोप मुलींनी केला.शिक्षण विभागाच्या अधिकारी यांच्या वाहनाची तोडफोड केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.
पोलिसही जखमी
वास्तविक पाहता आम्हाला शाळेत मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी या विद्यार्थ्यांची मागणी होती मात्र त्याकडे वरिष्ठांनी लक्ष दिले नाही त्यामुळे संतप्त विद्यार्थिनींनी शिक्षण अधिकाऱ्यांच्या गाडीवर हल्ला केला. मुलींनी गाडीवर जोरदार दगडफेक केली, लाठ्याकाठ्यांनी हल्लाही केला. यामुळे कारचे प्रचंड नुकसान झाले असून या मुलींची पोलिसांसोबतही बाचाबाचीही झाली. यात दोन पोलीस जखमी झाल्या आहेत, दरम्यान मुलींच्या मागण्या पूर्ण केल्या जातील, मुलींनी शांतता बाळगावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. तसेच मुलींना शाळेत बसण्याची अडचण निर्माण होत असेल तर दोन शिफ्टमध्ये वर्ग घेण्याचा शाळा प्रशासन विचार करत असल्याची संबंधितांकडून सांगण्यात आले आता या विद्यार्थिनींना कधी योग्य सोयी सुविधा उपलब्ध होतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
https://x.com/MumbaichaDon/status/1701638972148269250?s=20
Bihar Vaishali School Girl Attack Education Officer Car
Mahnar police station area of Vaishali, Bihar…where the students of Girls High School located at Patel Chowk in Mahnar Bazaar created a ruckus…the students vandalized the car of Mahnar Block Education Officer Ahilya Kumar