विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
बिहारच्या राजकारणात आज मोठा भूकंप झाला आहे. लोकजनशक्ती पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरुन चिराग पासवान यांना हटविण्यात आले आहे. काका पशुपती पारस यांनीच चिराग यांची गच्छंती केली आहे. तसेच, पारस यांच्या नेतृत्वातच पाच खासदारांनी लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्याकडे यापूर्वीच तक्रार केली आहे. पाच खासदारांच्या बंडाने पक्षामध्ये मोठी खळबळ उडाली आहे. चिराग यांना एकाकी पाडण्यासाठीच ही खेळी खेळल्याचे बोलले जात आहे. दिवंगत अध्यक्ष रामविलास पासवान यांच्या मृत्यूनंतर त्यांचे चिरंजीव चिराग हे आता मोठ्या अडचणीत सापडले आहेत. तर, या सर्व घडामोडी पाहता चिराग यांना आपल्या बाजूने खेचण्यासाठी काँग्रेस, आरजेडी व अन्य पक्षांनी हालचाली सुरू केल्या आहेत.
https://twitter.com/ANI/status/1404755956035063812