इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – बिहारच्या राजकारणात सध्या मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार हे थोड्याच वेळात राज्यपाल राज्यपाल फगू चौहान यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा सोपविणार असल्याचे सांगितले जात आहे. नितीश कुमार यांनी आज दुपारी ४ वाजेची वेळ राज्यपालांकडे मागितली आहे. नितीश कुमार हे भाजपची साथ सोडून काँग्रेस व अन्य पक्षांसोबत सरकार बनविणार असल्याचे सांगितले जात आहे.
दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली नीती आयोगाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला मुख्यमंत्री नितीश कुमार गैरहजर राहिले. एनडीएचे मित्रपक्ष आणि नितीश कुमार नाराज असल्याची जोरदार चर्चा आहे. यापूर्वी अनेकदा नितीश कुमारांनी राजकारणात कोणाला ना कोणाला दगा दिला आहे. त्यांची सध्याची वर्तणूक मात्र संभ्रमास्पद असल्याने पुढे काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीला उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे एनडीएच्या दोन मित्रपक्षांमध्ये बेबनाव होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मागील २० दिवसांपासून अशा प्रमुख बैठकांना भाजप आणि नितीश कुमार यांच्यात तणावाची स्थिती असल्याचे दिसून येत आहे. नितीश कुमारांचा जदयू आणि भाजपची युती तुटण्याच्या स्थितीत असल्याचे माध्यमांतून सांगण्यात येत आहे. नितीश कुमारांची पुन्हा एकदा लालू प्रसाद यादव यांच्या राजदसोबत जवळीक वाढली आहे. लालूंचा राजद, काँग्रेस आणि डाव्या आघाडीसोबत नितीश कुमार पुन्हा एकदा सत्ता स्थापन करण्याच्या प्रयत्नात असल्याचेही बोलले जात आहे.
Bihar Politics Chief Minister Nitish Kumar Governor Meet