इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – बिहारमध्ये आज चांगलेच राजकीय नाट्य घडले. जनता दल युनायडेट (जेडीयू)चे नेते असलेले नितीश कुमार यांनी आज दुपारी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे भाजपसोबतचे त्यांचे सरकार कोसळले. विशेष म्हणजे, नितीश यांनी राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) आणि काँग्रेस सोबत महागठबंधन केले असून उद्या दुपारी ते पुन्हा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. याद्वारे नितीश कुमार हे आठव्यांदा बिहारची सत्ता हाती घेण्याच्या तयारीत आहेत. उद्यास बुधवारी दुपारी २ वाजता बिहारचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. तर, आरजेडी नेते तेजस्वी यादव हे उपमुख्यमंत्री असतील. बुधवारी फक्त नितीश आणि तेजस्वी शपथ घेणार असल्याचे सूत्रांकडून समजते. मंत्रिमंडळ विस्तार नंतर होणार आहे.
नितीश कुमार यांनी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याशीही फोनवर चर्चा केली आहे. तत्पूर्वी, राजभवनात आमदारांना पाठिंबा देणारे पत्र सुपूर्द केल्यानंतर नितीशकुमार यांनी आपल्याला सात पक्षांचा पाठिंबा असल्याचा दावा केला. ज्यात १६४ आमदार आहेत. याशिवाय एका अपक्ष आमदाराचाही पाठिंबा आहे. आरजेडी नेते तेजस्वी यादव म्हणाले की, भाजपचे काम फक्त छोट्या पक्षांना नष्ट करणे आहे. यावेळी बिहारमध्ये तसे होणार नाही. बिहारमध्ये आम्हाला सर्व पक्षांचा पाठिंबा आहे. अशा स्थितीत भाजप विधानसभेत विरोधकांवर एकटा बसलेला दिसेल.
पाटणा येथे भाजपच्या कोअर ग्रुपची बैठक झाली. या बैठकीत रविशंकर प्रसाद, शाहनवाज हुसेन आणि गिरिराज सिंह यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. गिरीराज सिंह म्हणाले की, नितीश कुमार यांनी जनतेची फसवणूक केली आहे. जनता त्यांना नक्कीच धडा शिकवेल. त्याचवेळी रविशंकर प्रसाद यांनी नितीश यांना भाजपने त्यांचा पक्ष तोडल्याबद्दल प्रश्न विचारला. ते आमच्यासोबत कसे आणि का आले याची आठवण करून देण्याची गरज असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, तुम्ही लालूंना सोडले होते. आम्ही चारा घोटाळ्याची लढाई लढत होतो. मी वकील होतो, सुशील मोदी याचिकाकर्ते होते. रविशंकर प्रसाद म्हणाले की, तुम्ही समता पक्षाची स्थापना केली होती. तुम्ही भाजपसोबत राहिलात कारण जंगलराज कुटुंब लुटीच्या विरोधात होते.
Bihar Political Crisis Chief Minister Nitish Kumar