इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
बिहारमध्ये कथित बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी दक्षता विभागाने बेतिया येथील जिल्हा शिक्षणाधिकारी रजनीकांत प्रवीण यांच्या निवासस्थानी छापा टाकला. या छाप्यात मोठ्या प्रमाणात कॅश मिळाली आहे. ही कॅश मोजण्यासाठी मशिन मागवण्यात आले आहे. आज सकाळी ही छापेमारी करण्यात आली. या ठिकाणी नोटांनी भरलेलेल दोन बेड होते.
रजनीकांत प्रवीण सध्या जिल्हा शिक्षण अधिकारी, बेतिया (पश्चिम चंपारण) म्हणून २००५ ते आजपर्यंतच्या कालावधीत बेकायदेशीरपणे १,८७,२३,६२५ रूपये इतकी मोठी चल आणि जंगम मालमत्ता जमा केली आहे. शिक्षण विभागात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार होत असल्याच्या तक्रारीवरुन त्यांच्यावर अगोदरच कारवाई सुरु असतांना ही छापेमारी करण्यात आली.