पाटणा (बिहार) – राज्याचे अतिरीक्त आरोग्य सचिव रवी शंकर चौधरी यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. त्यांच्यावर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. काही दिवसांपूर्वी त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यामुळे ते हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल झाले होते. राज्याचे आरोग्य सचिवांचेच कोरोनामुळे निधन झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. अतिशय हुशार आणि कर्तव्यदक्ष सनदी अधिकारी म्हणून त्यांचा नावलौकिक होता. त्यांनी प्रशासनात विविध विभागांमध्ये जबाबदारी सांभाळली आणि उल्लेखनीय कार्य केले होते.
https://twitter.com/ANI/status/1385577606196596738