मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- भारत निवडणूक आयोगाच्यावतीने बिहारमध्ये सुरू असलेल्या विशेष संक्षिप्त पुनरावलोकनात (Special Intensive Revision – SIR) आतापर्यंत सुमारे १८.६६ लाख मतदार मृत, २६.०१ लाख अन्य मतदार स्थलांतरित झालेले असून, ७.५ लाख मतदारांची नोंदणी दोन ठिकाणी आढळली आहे.
या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने जोरदार मोहीम हाती घेतली असून, येत्या १ ऑगस्ट २०२५ रोजी प्रारूप मतदार यादी प्रकाशित करण्यात येणार आहे. त्यासाठी सुमारे १ लाख बीएलओ (BLO), ४ लाख स्वयंसेवक आणि १२ प्रमुख राजकीय पक्षांच्या जिल्हाध्यक्षांनी नियुक्त केलेले १.५ लाख बीएलए (BLA) कार्यरत आहेत.
आतापर्यंत प्राप्त माहिती :
एकूण मतदार (२४ जून २०२५ रोजीपर्यंत): ७,८९,६९,८४४
प्राप्त गणनापत्रक (Enumeration Forms): ७,१६,०४,१०२ (९०.६७%)
डिजिटायझ्ड गणनापत्रक: ७,१३,६५,४६० (९०.३७%)
पत्त्यावर न सापडलेले मतदार: ५२,३०,१२६ (६.६२%)
मृत मतदार: १८,६६,८६९ (२.३६%)
कायमचे स्थलांतरित: २६,०१,०३१ (३.२९%)
दुहेरी नोंदणी: ७,५०,७४२ (०.९५%)
न सापडणारे: ११,४८४ (०.०१%)
एकूण कव्हर झालेले मतदार : ७,६८,३४,२२८ (९७.३०%)
अद्याप प्राप्त न झालेले गणनापत्रक: २१,३५,६१६ (२.७०%)
याबाबत १ ऑगस्ट ते १ सप्टेंबर २०२५ या कालावधीत सर्वसामान्य नागरिकांना प्रारूप मतदार यादीबाबत अधिकाऱ्यांकडे हरकती, दुरुस्ती, समावेश किंवा वगळण्याबाबत अर्ज करता येणार आहे, असे भारत निवडणूक आयोगाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.