इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – हायड्रोसीलची शस्त्रक्रिया करण्यासाठी सरकारी रुग्णालयात जाणे एका युवकाला चांगलेच महागात पडले आहे. डॉक्टरांच्या चुकीमुळे या अविवाहित तरुणाची नसबंदी करण्यात आली असल्याने त्याचे भावी वैवाहिक आयुष्य धोक्यात आले आहे.
बिहारच्या कैमूरमधून एक विचित्र बातमी समोर आली आहे. येथील एक तरूण रुग्णालयात हायड्रोसीलचं ऑपरेशन करण्यासाठी गेला होता. परंतु डॉक्टरांनी त्याची नसबंदी केली. नसबंदीची शस्त्रक्रिया झाल्यापासून हा तरूण आणि त्याचं कुटुंब चिंतेत आहे. आता आपलं लग्न कसं होणार? असा प्रश्न त्याला पडला आहे. हे प्रकरण बिहारच्या कैमूर जिल्ह्यातील चैनपूर आरोग्य केंद्रातलं आहे. या प्रकरणाबाबत असं सांगितलं जात आहे की, हा तरूण आरोग्य केंद्रात हायड्रोसीलचं ऑपरेशन करण्यासाठी गेला होता. परंतु डॉक्टरांनी त्याची नसबंदी केली. या तरुणाची नसबंदी केली असल्याची माहिती त्याच्या कुटुंबियांना समजल्यापासून तो आणि त्याचं कुटुंब चिंतेत आहे. तसेच त्यांनी डॉक्टरांविरोधात संतापदेखील व्यक्त केला.
पीडित कुटुंबाने आता पोलीस ठाण्याची वाट धरली आहे. ही घटना चैनपूरमधील जगरिया गावातील एका तरुणासोबत घडली आहे. तरुणाला हायड्रोसीलचा त्रास होता. त्यानंतर तो आशा सेविकांच्या मार्गदर्शनानंतर चैनपूर रुग्णालयात दाखल झाला. रुग्णालयात त्याचं हायड्रोसीलचं ऑपरेशन केलं जाणार होतं. परंतु डॉक्टरांनी त्याची नसबंदी केली. हा प्रकार तरुणाला समजल्यावर त्याला मोठा धक्का बसला. तरुणाचे अजून लग्नही झालेले नाही. त्यामुळे आता त्याचं लग्न कसं होणार याची चिंता त्याला आणि त्याच्या घरच्यांना लागली आहे. हे धक्कादायक प्रकरण मंगळवारी रात्रीचं आहे.
डॉक्टरांनी फेटाळले आरोप
तुमच्याकडे पैसे असतील खासगी रुग्णालयात जाऊन हायड्रोसीलचे ऑपरेशन करून घ्या. आम्ही याची नसबंदी करून दिली आहे, असे शब्द वापरल्याचा आरोप युवकाच्या वडीलांनी लावला आहे. मात्र, डॉक्टरांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
Bihar Doctor Surgery Family Planning Wrong Medical Treatment