इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – बिहार राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे उडाले आहेत, कारण गेल्या काही दिवसांपासून राज्यात चोऱ्या, दरोडे, हाणामाऱ्या, महिलांवरील अत्याचारांमध्ये मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यातच एक भयानक घटना उघडकीस आली असून एका शाळेमध्ये शिक्षण संचालकाचे मुलानेच अल्पवयीन मुलीवर दोन सतत दोन वर्षे अत्याचार तथा लैंगिक अत्याचार केले. विशेष म्हणजे या भयानक वाईट कृत्यासाठी शाळेतील मुख्याध्यापिकेनेच मदत केली असल्याचे आढळले आहे. एक मुख्याध्यापिका तथा शिक्षिका ही गुरुजन असताना असे कृत्य कसे काय करू शकते ? असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.
मुख्याध्यापिका मुख्य सूत्रधार
शारसा जिल्ह्यात ही भयानक घटना घडली आहे. अल्पवयीन मुलीवर शाळेच्या संचालकाच्या मुलाने सतत दोन वर्षे बलात्कार केला. सन २०१७ मध्ये ही घटना घडली, ही मुलगी तेव्हा सहावीत होती, आता ती मुलगी आता सतरा वर्षांची आहे. अल्पवयीन मुलीने सांगितले की, मी सहावीत असताना मला फी भरणे शक्य झाले नाही, त्यामुळे मला आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिकेने बोलवून घेतले. सुरुवातीला त्या माझ्यावर रागावल्या नंतर म्हणाल्या की, माझ्या बरोबर चल. मी त्यांच्याबरोबर चालत गेले. त्यांनी मला आमच्या शाळेच्या कोपऱ्यातील वाचनालयात नेले. तिथे एक छोटीशी खोली होती. त्यांनी मला त्या खोलीत जायला सांगितलं. मी आतमध्ये गेल्यावर त्यांनी खोलीला बाहेरुन कडी लावून घेतली. मी घाबरुन गेले होते. तेव्हाच मला हे लक्षात आले की, त्या खोलीत मी एकटी नव्हते. तिथे आमच्या शाळेच्या संचालकांचा मुलगा होता. तो माझ्या जवळ आला, त्याने माझे केस ओढले आणि माझ्यावर बलात्कार केला. तसेच त्याने या वाईट घटनेचे शूटिंग केले माझ्यावर अत्याचार होत होता, माझे कपडे फाटले.
मैत्रिणीला सांगितला तो सगळा प्रसंग
हा वाईट प्रसंग घडला तेव्हा ती मुलगी पळून जाण्याचा प्रयत्न करत होती, मात्र बाहेर पडत असताना त्या लंपट मुख्याध्यापिकेने त्या मुलीच्या थोबाडीत मारले, तसेच तिला पुन्हा एकदा त्या खोलीत ढकलले, त्यानंतर तिला कपडे आणि केस व्यवस्थित करायला सांगितले. हिचकी या घटनेची कुठेही वाच्यता करू नको अशी तंबी दिली. जेव्हा ती शाळेत गेली तेव्हा पुन्हा तिच्यावर बलात्कार झाला. तेव्हा मुख्याधापिकेने तिला सांगितले की तू काय सांगशील तुझ्या आई-वडिलांना आणि ते तुझ्यावर विश्वास ठेवतील का? दोन वर्षे तिच्यावर अनेकवेळा शाळेच्या संचालकाच्या मुलानेच माझ्यावर दोन वर्षांमध्ये वारंवार बलात्कार केला. एवढंच नाही तर तिला प्रत्येक वेळी ही धमकी दिली जायची की तुझ्यावर बलात्कार करण्यात आला त्याचे व्हिडीओ आमच्याकडे आहेत. जर तू याविषयी कुणाला काही बोललीस तर आम्ही ते व्हिडीओ व्हायरल करु. त्या धक्क्यातून ती अजूनही सावरलेली नाही, असे या मुलीने सांगितले. तिच्या मैत्रिणी तिला कायम विचारत असत की, काय झाले तू इतकी अस्वस्थ आहेत? त्यावर अखेर एक दिवस तिने मैत्रिणीला काय घडले हे सांगितलेच. त्यानंतर तिने आई वडिलांनाही सांगितले. आता आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मुलीच्या भावाने आणि आई वडिलांनी केलेल्या तक्रारीनंतर त्या शाळेच्या संचालकांचा मुलगा आणि मुख्याध्यापिका या दोघांना अटक करण्यात आली आहे.
Bihar Crime School Director Son Rape Minor Girl Student