इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – आजही आपल्याकडे गोऱ्या रंगला प्रचंड महत्त्व आहे. लग्नाच्या बाजारात तर गोरा रंग फारच मॅटर करतो. केवळ या कारणावरून मुलींची लग्न जमत नाहीत किंवा जुळलेली लग्ने मोडतात. हा अनुभव मुलींसाठी काही नवीन नाही. पण यापेक्षा एक वेगळी गोष्ट आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ऐन मांडवात एक मुलीने लग्न मोडल्याची घटना बिहारमध्ये घडली आहे.
भर मांडवात नवरीने लग्नाला नकार दिल्याने खळबळ उडाली आहे. याहीपेक्षा महत्त्वाचं आहे ते लग्न मोडण्याचं कारण. मंगलाष्टक सुरू असतानाच नवरीच्या कानात तिच्या नातेवाईकांनी काहीतरी सांगितले आणि तिने तात्काळ लग्न करायला नकार दिला. नवरीने ऐनवेळी घेतलेला निर्णय ऐकून तिच्या घरच्यांचे तर धाबेच दणाणले. त्यातही मुहूर्त टळून जात असल्याने कुटुंबीयांनी तिला समजावले पण तरीही ती आपल्या निर्णयावर ठाम राहिली. हस्ते परहस्ते ही गोष्ट नवरदेवापर्यंत पोहोचली. याचे कारण जाणून घेण्याचा प्रयत्न नवरदेवाने केला. तेव्हा वधूने सांगितलेले कारण ऐकून सगळेच चक्रावले. तर, मांडवात उपस्थित असलेल्या वऱ्हाड्यांचा संताप अनावर झाला. नवरीचा हा निर्णय ऐकून हतबल झालेला नवरदेव कुटुंबासह मांडवातून निघून गेला. घडलेला प्रकार पाहून वऱ्हाडीदेखील लग्न मांडवातून परतले. हा अजब प्रकार ऐकून अनेकांनी नवरीबाबत संतप्त प्रतिक्रियादेखील दिली आहे.
काय आहे प्रकरण?
खरं तर नवरीपेक्षाही तिच्या नातेवाईकांनी या लग्नात खोडा घातला. नवरदेव तुझ्यापेक्षा वयाने मोठा आहे. शिवाय त्यांचा रंगही काळा आहे, अशी माहिती एका नातेवाईकाने नवरीला दिली. त्यांनी दिलेली माहिती ऐकून नवरी अस्वस्थ झाली. काळ्या रंगाविषयी मुळातच तिला राग होता. त्यामुळे तिने मंगलाष्टका सुरू होण्यापूर्वीच लग्नाला नकार कळवला. मुलीचा नकार आणि नकाराचे कारण कळताच तिच्या वडिलांनी तिला समजावण्याचा प्रयत्न केला. तसंच, तिच्या बहिणीसह होणाऱ्या सासऱ्यांनीही तिला लग्न न मोडण्याची विनंती केली. मात्र, तिने कोणाचेच ऐकून घेतले नाही.
आत्महत्येची धमकी
लग्नाच्या इतर विधी झाल्या होत्या फक्त मंगलाष्टका बाकी असताना लग्न मोडणं योग्य ठरणार नाही, असं वधुच्या वडिलांनी तिला समजवण्याचा प्रयत्न केला. लग्नाला आलेल्या नातेवाईकांनीही तिने मत बदलावे म्हणून तिला गळ घातली. मात्र तिने कोणाचच ऐकून घेतलं नाही. याउलट कोणी मला लग्न करण्यासाठी जबरदस्ती केली तर मी आत्महत्या करेन, अशी धमकी दिली.
Bihar Bride Cancel Wedding Due to