पुणे (इंडिया दर्पण ऑनलाई डेस्क) – नवीन वर्षाला सुरुवात होऊन आठवडा उलटला आहे. त्यामुळे सुट्टीची मजा घेऊन अनेक जण आपापल्या कामकाजाला आणि उद्योगधंद्याला लागलेले आहेत. तसेच नव्या वर्षात अनेकांनी वेगवेगळ्या संकल्प केले असून ते संकल्पपूर्तीसाठी वाटचाल देखील सुरू आहे. त्यातच नवीन वर्षात अनेकांना नवीन वस्तूंची खरेदी करावयाचे आहे. त्यात प्रामुख्याने स्मार्टफोन, टीव्ही, दुचाकी आणि चारचाकी वाहनांचा समावेश आहे. परंतु आता स्मार्टफोन आणि टीव्ही घेणाऱ्या ग्राहकांसाठी खूपच फायदा होणार आहे.
‘सेव्हिंग डेज’ ची घोषणा
नवीन वर्षात आपणही स्मार्टफोन किंवा स्मार्ट टीव्ही घेण्याचा विचार करत असाल, तर हीच योग्य वेळ आहे. कारण Amazon ने नवीनतम स्मार्ट टीव्ही, स्मार्टफोन आणि अॅक्सेसरीजवर आकर्षक सूट आणि ऑफर एकत्र आणत, मोबाईल आणि टीव्ही ‘सेव्हिंग डेज’ची घोषणा केली आहे. या सेल दरम्यान, ग्राहकांना त्यांच्या आवडत्या ब्रँड्सवर 10 टक्क्यांपर्यंत झटपट सूट मिळू शकेल. त्यामध्ये OnePlus, Xiaomi, Samsung, Oppo, Tecno, Vivo आणि Realme यांचा समावेश आहे.
10 जानेवारीपर्यंत संधी
नवीनतम Tecno Spark 8T, Tecno Spark 8 Pro, OnePlus Nord CE, OnePlus Nord 2, Samsung S20 FE 5G, Mi 11X, Xiaomi 11 Lite NE 5G, Redmi Note 10S, Redmi Note 10 Lite, Oppo F19 Pro, Vivo यापैकी आहेत विशेष म्हणजे मोबाईल आणि टीव्ही सेव्हिंग डे योजना दि. 10 जानेवारीपर्यंत सुरू असणार आहे.
सूट व ऑफर्सचा पाऊस
Citibank क्रेडिट आणि डेबिट कार्ड वापरून Citibank क्रेडिट कार्ड EMI व्यवहारांवर ग्राहक 1,000 आणि 1,250 रूपयांपर्यंतची त्वरीत सूट घेऊ शकतात. ग्राहक त्यांच्या पसंतीच्या स्मार्टफोनवर 12 महिन्यांपर्यंत आकर्षक एक्सचेंज ऑफर आणि सोयीस्कर विनाखर्च EMI चा देखील लाभ घेऊ शकतात. प्राइम सदस्यांना अॅडव्हांटेज जस्ट फॉर प्राइमसह 20,000 रुपयांपर्यंतची बचत मिळू शकते, ज्यामध्ये HDFC बँकेच्या डेबिट आणि क्रेडिट कार्डवर 6 महिने मोफत स्क्रीन रिप्लेसमेंट आणि अतिरिक्त 3 महिने विनाशुल्क EMI यांसारखे फायदे समाविष्ट आहेत. तसेच 12 जानेवारीपर्यंत थेट असणार्या प्रीमियम फोन पार्टी इव्हेंटसह ग्राहक सर्वात कमी किमतीत फ्लॅगशिप फोन देखील मिळवू शकतात. तुम्हाला फ्लॅगशिप स्मार्टफोन्सवर 40 टक्क्यां पर्यंत सूट आणि Amazon कूपनसह 5,000 रूपयांपर्यंतची अतिरिक्त सूट मिळू शकते.
सर्वोत्तम डील
Xiaomi ऑफर
सेल दरम्यान, फ्लॅगशिप Mi 11X फोन सवलत, कॅश बॅक आणि एक्सचेंज स्वीटनरसह 23,499 रुपयां मध्ये उपलब्ध असेल. नुकताच लाँच केलेला Xiaomi 11 Lite NE 5G फोन 19,999 रुपयांमध्ये उपलब्ध असेल, त्यामध्ये डिस्काउंट, बँक कॅशबॅक आणि एक्सचेंज स्वीटनरचा समावेश आहे. तसेच सर्वाधिक विकला जाणारा Redmi 9A 7,199 रुपयांमध्ये 10 टक्के इन्स्टंट डिस्काउंटसह उपलब्ध असेल. सर्वाधिक विकला जाणारा Redmi TV 32-इंचाचा HD रेडी टीव्ही 14,999 रुपयांपासून सुरू होईल. 44,999 रुपयांचा MRP असलेला Redmi TV 50-इंचाचा टीव्ही 37,999 रुपयांना उपलब्ध होईल. Mi 40-इंचाचा Horizon FHD टीव्ही 24,999 रुपयांपासून उपलब्ध असून 6,000 रुपयांच्या बचतीसह उपलब्ध होईल
सॅमसंग ऑफर
Samsung Galaxy S20 FE 5G हा 39,990 रुपयांत 46 टक्के सूटमध्ये उपलब्ध असेल आणि फोनवर अतिरिक्त 10 टक्के सूट मिळवून तो 38,740 रुपयांमध्ये देखील खरेदी करता येईल. तसेच नुकताच लाँच केलेला Samsung Galaxy M52 5G हा फोन 24,999 रुपयांना उपलब्ध असेल, त्यामध्ये सवलत आणि कूपनसह 5,000 रुपयांचा समावेश आहे. सर्वात लोकप्रिय Samsung 43″ Crystal 4K Pro UHD टीव्ही 37,990 रुपयांपासून उपलब्ध होईल.
OnePlus ऑफर
OnePlus 9 सिरीज आतापर्यंतच्या सर्वात कमी किमतीत उपलब्ध असेल. OnePlus 9R स्मार्टफोन 33,999 रुपयांमध्ये, OnePlus 9 फोन हा 36,999 रूपयांमध्ये आणि OnePlus 9 Proहा 54,999 रुपयांमध्ये बँक डिस्काउंट, कूपन आणि एक्सचेंज ऑफरसह उपलब्ध असेल. OnePlus Nord CE आणि OnePlus Nord 2 फोन 23,499 रूपये आणि 27,999 रुपयांमध्ये उपलब्ध असतील, यामध्ये Amazon कूपनसह सूट समाविष्ट आहे. तसेच वनप्लस टीव्ही 17,999 रुपयांपासून उपलब्ध असतील.
iQOO ऑफर
सेल दरम्यान, ग्राहक iQOO Z5 रु. 21,990 मध्ये आणि iQOO 7 रु. 27,990 मध्ये खरेदी करू शकतील, ज्यामध्ये Amazon कूपनसह रु. 2,000 ची सूट आहे.
Tecno ऑफर
नुकतेच लाँच केलेले नवीनतम Tecno Spark 8T आणि Tecno Spark 8 Pro फोन Citibank कार्डसह 10% इन्स्टंट डिस्काउंटसह 8,550 आणि 9,540 रूपयांमध्ये उपलब्ध असतील.
Oppo-Vivo ऑफर
OPPO F19 Pro+ आणि Vivo 21 वर अतिरिक्त 10 टक्के सूट मिळणार असून ग्राहकांना याचा मोठा फायदा होणार आहे.
स्मार्ट टीव्ही ऑफर
Amazon Basics 50-इंच 4K टीव्हीवर 40 टक्क्यांपर्यंत सूट मिळणार असून याची सुरुवात 32,999 रुपयांपासून आहे. प्रीमियम Sony 50-इंच 4K UHD Google TV वर 30 टक्के सूट मिळणार असून याची सुरुवात 77,990 रुपयांपासून होणार आहे. तसेच iFFALCON 43 इंच 4K UHD टीव्ही हा 48 टक्क्यांपर्यंत सूटसह उपलब्ध असेल.