मंगळवार, जुलै 8, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

मोठा दिलासा! सीएनजी-पीएनजीच्या किंमती कमी होणार; इतक्या टक्क्यांपर्यंत खाली येणार

by Gautam Sancheti
एप्रिल 7, 2023 | 1:52 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

प्रातिनिधीक संग्रहित फोटो


 

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सीएनजी-पीएनजीच्या आणि घरगुती वापराच्या सिलींडरच्या सातत्याने वाढत्या किंमती ग्राहकांसाठी डोकेदुखी ठरत आहेत. मात्र आता केंद्र सरकारच्या नव्या फॉर्म्युल्यामुळे पाईपलाईनद्वारे पुरविल्या जाणाऱ्या गॅसच्या किंमती घटण्याची शक्यता आहे. पंतप्रधानांच्या अध्यक्षतेत झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत पारीख समितीच्या शिफारशींना मंजुरी देण्यात आली आहे.

नवीन फॉर्म्युलामध्ये दोन वर्षांसाठी कमाल मर्यादा कायम राहणार आहे. त्यानंतर प्रति ब्रिटिश थर्मल युनिट ०.२५ डॉलरची वार्षिक वाढ होईल. सीएनजी-पीएनजीचे दर आता दर महिन्याला निश्चित होतील. सध्या दर सहा महिन्यांनी दर निश्चित केले जातात. गॅस उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी अतिरिक्त उत्पादनावर २० टक्के प्रीमियम देण्याचा प्रस्ताव आहे.

विद्यमान उत्पादकांनी गॅस उत्पादन वाढविल्यास घोषित किमतीव्यतिरिक्त त्यांना २० टक्के प्रीमियमच्या स्वरूपात प्रोत्साहन दिले जाईल. यामुळे उत्पादकांना नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन वाढविण्यास प्रोत्साहन मिळेल, असा विश्वास केंद्र सरकारला आहे. पारीख समितीनेही गॅस जीएसटीच्या कक्षेत आणण्याची शिफारस केली आहे. यामध्ये गॅसवर तीन टक्के ते २४ टक्के असा सर्वसाधारण कर लावण्याची शिफारस करण्यात आली आहे. यामुळे गॅस मार्केटला चालना मिळण्यास मदत होण्याची शक्यता आहे.

दहा टक्क्यांनी किंमती घटणार!
नव्या फॉर्म्युल्यामुळे सीएनजी-पीएनजीच्या किंमती दहा टक्क्यांनी कमी होण्याची शक्यता आहे. यामागचे गणीत केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी स्पष्ट केले आहे. ‘पारंपरिक क्षेत्रातून तयार होणारा नैसर्गिक वायू आता अमेरिका-रशियाप्रमाणे कच्च्या तेलाच्या किमतींशी जोडला जाणार आहे. यापूर्वी गॅसच्या किंमतींच्या आधारे दर निश्चित व्हायचे.

आता एपीएम गॅसची किंमत भारतीय बास्केटमधील कच्च्या तेलाच्या किंमतींच्या १० टक्के असेल. ही किंमत प्रति दशलक्ष ब्रिटिश थर्मल युनिट ६.५ डॉलरपेक्षा जास्त असणार नाही. मूळ किंमत ४ युनिट प्रति डॉलर ठेवण्यात आली आहे. सध्याची गॅस किंमत ८.५७ डॉलर आहे.

दिल्लीत दर घटणार
नव्या फॉर्म्युल्यामुळे दिल्लीत ६ रुपयांनी आणि मेरठमध्ये ८ रुपयांनी गॅसच्या किंमती कमी होतील. या निर्णयामुळे दिल्लीतील सीएनजी आणि पीएनजीच्या किमती ६ रुपयांपर्यंत कमी होऊ शकतात. सध्या दिल्लीत सीएनजी ७९.५६ रुपये प्रति किलो आणि पीएनजी ५३.५९ रुपये प्रति हजार क्युबिक मीटर आहे.

सस्ती होगी CNG और PNG!

PM श्री @narendramodi जी की अध्यक्षता में केंद्रीय कैबिनेट ने संशोधित घरेलू गैस मूल्य निर्धारण दिशा-निर्देशों को मंजूरी दी।

मूल्य निर्धारण के नए फार्मूले के तहत CNG और PNG के दाम 10% तक कम हो जाएंगे।@PMOIndia @ianuragthakur #CabinetDecisions pic.twitter.com/pm5c91UiYu

— Dr Harsh Vardhan (Modi Ka Pariwar) (@drharshvardhan) April 6, 2023

Big Relief CNG PNG rates Will Reduced

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

देशात गेल्या २४ तासात ६ हजार ५० नवीन कोरोना रुग्णांची नोंद

Next Post

शेअर बाजारात प्रचंड शांतता…. सलग तीन दिवस व्यवहार ठप्प.. हे आहे कारण

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
share market1 scaled e1696738757626

शेअर बाजारात प्रचंड शांतता.... सलग तीन दिवस व्यवहार ठप्प.. हे आहे कारण

ताज्या बातम्या

Raj Thackeray

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसैनिकांना दिला हा स्पष्ट आदेश….

जुलै 8, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी प्रयत्नांमध्ये काटकसर करू नये, जाणून घ्या, बुधवार, ९ जुलैचे राशिभविष्य

जुलै 8, 2025
IMG 20250708 WA0417 1

एमएमसीअंतर्गत होमिओपॅथिक डॉक्‍टरांच्‍या नोंदणीला विरोध…आयएमए नाशिकतर्फे जिल्‍हाधिकार्यांना निवेदन

जुलै 8, 2025
solar e1703396140989

मॉडेल सौर ग्राम स्पर्धेमध्ये राज्यातील ६३ गावांचा सहभाग…विजेत्या गावाला केंद्राकडून एक कोटी रुपयांचे अनुदान

जुलै 8, 2025
bus

एस.टी. कार्यशाळेतील भांडार खरेदीत घोटाळा…१५ अधिकाऱ्यांवर होणार कारवाई

जुलै 8, 2025
crime1

रिक्षातून शेतातील साहित्य चोरून नेणा-या दोघांना पोलीसांनी ठोकल्या बेड्या

जुलै 8, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011