नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलिंडर दरात कपात करुन गॅस सिलेंडरचे दर हे २०० रुपयांपर्यत कमी केले आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने आजच्या बैठकीत हा निर्णय़ घेतला आहे. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या तारखेला पेट्रोलियम कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी सिलेंडरची किंमत १०० रुपयांनी कमी केली होती. पण घरगुती सिलेंडरच्या दरात कोणताही बदल केला नव्हता.
देशात पुढच्या वर्षी लोकसभेची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीच्या आधी मोदी सरकारने सर्वसामान्यांसाठी मोठा दिलासादायक निर्णय घेतला आहे. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळणार आहे. गेल्या काही दिवसापासून सर्वच वस्तूंचे दर वाढले आहे. त्यामुळे महागाईवर जनतेत संताप होता. त्यात गॅस सिलेंडरचे दर वारंवार वाढत होते. त्यामुळे महागाई हा कळीचा मुद्दा होवू नये म्हणून केंद्र सरकारने हे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. महागाईने त्रासलेल्या जनतेला केंद्र सरकारने मोठा दिलासा दिला आहे.
रक्षाबंधनाची भेट
घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात २०० रुपयांची सरसकट कपात करण्यात आली आहे. ही कपात केवळ उज्वला गॅस योजनेतील १० कोटी लाभार्थींसाठी नसेल तर सर्व ३३ कोटी गॅस धारकांसाठी लागू असेल. उज्वला गॅस धारकांसाठी २०० रुपये सबसिडी आधीच होती ती आता ४०० होईल तर सर्वसामान्यांसाठी २०० रुपयांचा दिलासा देण्यात आला आहे. ही मोदी सरकारची सर्व महिलांना रक्षाबंधनाची भेट असल्याचा केंद्रीय माहिती प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांचा पत्रकार परिषदेत दावा केला. दिल्लीत घरगुती गॅस सिलेंडरचा दर ११०३ रुपये आहे. म्हणजे यात २०० रुपयांची कपात होणार आहे.
Big reduction in domestic gas cylinder rates