मुंबई – महिंद्रा एसयूव्ही खरेदी करण्याची ग्राहकांसाठी चांगली संधी चालून आली आहे. सप्टेंबरमध्ये महिंद्रा आपल्या वाहनांवर २.५ लाख रुपयांची सवलत देत आहे. त्यामध्ये रोख रकमेत सवलत, एक्स्चेंज बोनस, एक्सेसरीज आणि कॉर्पोरेट बेनिफिट्सचा समावेश आहे. सर्वाधिक सवलत Mahindra XUV 500 वर मिळत आहे. त्याशिवाय XUV300, Marazzo MPV आणि Alturas G4 सारखे वाहने सुद्धा सवलतीच्या दरात खरेदी केली जाऊ शकतात.
Mahindra XUV30 आणि Scorpio वर सवलत
कंपनीच्या सब कॉम्पॅक्ट एसयूव्हीवर जवळपास ४० हजार रुपयांची सवलत मिळत आहे. कारच्या निवडक टॉप व्हेरिएंटवर १५ हजार रुपयांपर्यंत कॅश डिस्काउंट, २० हजारांपर्यंत एक्स्चेंज बोनस आणि चार हजार रुपयांपर्यंत कॉर्पोरेट डिस्काउंट मिळणार आहे. याचप्रमाणे कंपनीच्या स्कॉर्पिओवर १४ हजार रुपयांपर्यंत सवलत मिळत आहे. स्कॉर्पिओच्या S9 प्लस, S5 आणि S7 सारख्या लहान व्हेरिएंटवर ४ हजार रुपयांपर्यंत कॉर्पोरेट सवलत दिली जात आहे.
Marazzo MPV, Alturas G4 वर ऑफर
Marazzo MPV आणि Alturas G4 वर ५,२०० रुपये आणि ११,५०० रुपयांपर्यंतची कॉर्पोरेट सवलत मिळत आहे. KUV100 NXT च्या निवडक व्हेरिएंटवर सप्टेंबरमध्ये ३८ हजारांपर्यंत कॅश डिस्काउंट आणि तीन हजार रुपयांपर्यंत कॉर्पोरेट डिस्काउंटवर खरेदी केली जाऊ शकते. महिंद्रा बोलेरोवर दहा हजार रुपयांपर्यंत कॅश डिस्काउंट आणि तीन हजार रुपयांपर्यंत कॉर्पोरेट डिस्काउंट मिळत आहे.
Mahindra XUV500 वर २.५ लाखांची सवलत
Mahindra XUV500 वर या महिन्यात सर्वाधिक २.५ लाखांची सवलत मिळणार आहे. या कारवर दोन लाख रुपयांपर्यंत कॅश डिस्काउंट, ५० हजार रुपयांपर्यंत एक्स्चेंज बोनस आणि ६,५०० रुपयांपर्यंत कॉर्पोरेट डिस्काउंट मिळत आहे. बोलेरो नियो आणि महिंद्रा थारवर कोणतीच ऑफर देण्यात आलेली नाही.