मुंबई – मोबाईलची क्रेझ अनेकांना असते. त्यातल्या त्यात आयफोन घेण्याची अनेकांची इच्छा असते. पण त्याची किंमत बघून ही इच्छा काही पूर्ण होत नाही. तुमची पण अशी काही इच्छा असेल, तर ती पूर्ण करण्याची उत्तम संधी चालून आली आहे.
फ्लिपकार्टच्या बिग सेव्हिंग डेजमुळे ही इच्छा पूर्ण होणार आहे. या सेलमध्ये आयफोन एसई 2020 हे मॉडेल विक्रीसाठी ठेवण्यात आले आहे. 28 हजार 999 रुपयांत उपलब्ध आहे. या फोनवर 11 हजार रुपयांची सूट देण्यात आली आहे. यात एक्स्चेंज ऑफर तर आहेच पण त्याशिवाय काही डिस्काऊंटही दिला आहे.
आयफोन एसई स्मार्टफोनच्या 64 जीबी स्टोअरेज फोनची किंमत 39 हजार 900 रुपये आहे. 128 जीबी स्टोअरेज असलेल्या फोनची किंमत 44 हजार 900 तर 256 जीबी स्टोअरेज असलेला फोन 54 हजार 900 रुपयांना मिळतो. डिस्काऊंटनंतर हे सगळे फोन अनुक्रमे 28 हजार 999, 33 हजार 999 आणि 43 हजार 900 रुपयांना मिळतील. तसंच तुमच्याकडे आयसीआयसीआयचे डेबिट किंवा क्रेडिट कार्ड असेल तर त्यावरही 10 टक्के सूट मिळेल.
आयफोनची वैशिष्ट्ये
आयफोन एसई (2020) मध्ये 1334 ×750 पिक्सेल स्क्रीन रिझोल्युशन असून 4.7 इंचाची आयपीएस एलसीडी डिस्प्ले स्क्रीन आहे. सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत उत्तम अशी ए13 बायॉनिक चिप या फोनमध्ये आहे. तसेच थर्ड जनरेशन न्यूरॉल इंजिन प्रोसेसरही यात आहे. यासोबतच या फोनला आयपी 67 सर्टिफिकेशन आहे, ज्यामुळे पाणी, धूळ, मातीपासून त्याचे संरक्षण होते. फोटोग्राफीची आवड असेल तर 12 एमपी चा रिअर तर सेल्फीसाठी 7 एमपीचा कॅमेरा यात आहे. याशिवाय ओआयएस, ड्युअल टोन, ड्युअल एलईडी फ्लॅश अशी फीचर्सही आहेत.