मुंबई – सध्या सणासुदीचे दिवस असून दिवाळीचा सण जवळ येऊन ठेपला आहे. सहाजिकच नवनवीन वस्तू खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल असतो. तर काही जण नवी घर घेणे असा विचार करतात, कारण प्रत्येकाला स्वतःचे आपले हक्काचे घर असावे असेही वाटते. त्यासाठी काही बँका होम लोन घेणाऱ्या ग्राहकांना मोठी ऑफर देत आहेत. देशातील दोन आघाडीच्या खाजगी बँका म्हणजे अॅक्सिस बँक आणि इंडसइंड बँक सणापूर्वी दोन मोठ्या ऑफर्स घेऊन आल्या आहेत. ही ऑफर अशी आहे की, त्याचा घर खरेदी आणि इतर वस्तू खरेदीमध्ये खूप उपयोग होईल. इंडसइंड बँकेच्या ऑफरमध्ये डेबिट कार्डवर खरेदी करताना ईएमआयमध्ये रूपांतर करण्याचा पर्याय समाविष्ट आहे, तर अॅक्सिस बँक उत्सवाच्या ऑफरचा भाग म्हणून निवडक होम लोन किंवा अन्य इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांवर 12 मासिक हप्त्यांवर (ईएमआयमध्ये) सूट देत आहे.
इंडसइंड बँकेने उत्सवाच्या ऑफर अंतर्गत डेबिट कार्ड सुविधेवर ईएमआय सुरू केल्याचे जाहीर केले आहे. बँकेचा ग्राहक कोणत्याही सहभागी स्टोअरमध्ये खरेदी करू शकतो आणि डेबिट कार्डवर ईएमआयची सुविधा घेऊ शकतो. याबाबत इंडसइंड बँकेचे सीडीओ चारू माथूर यांच्या म्हणण्यानुसार, बँकेने 60 हजार ऑफलाइन स्टोअरमध्ये भागीदारी केली आहे. यात ग्राहक गृहोपयोगी वस्तू, इलेक्ट्रॉनिक्स, कपडे, ऑटोमोबाईल, होम डेकोर, रुग्णालये आणि इतरांचा समावेश आहे. येथे, जेव्हा ग्राहक खरेदी करेल, डेबिट कार्डने पैसे भरल्यानंतर, त्याला त्या खरेदीचे EMI मध्ये रूपांतर करण्याची संधी मिळेल. तो आपली खरेदी 3 ते 24 महिन्यांच्या ईएमआयमध्ये रूपांतरित करू शकतो.
दुसरीकडे अॅक्सिस बँकेने गृहकर्जाव्यतिरिक्त विविध ऑनलाइन खरेदीवर सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. बँकेने म्हटले आहे की ती निवडक गृहकर्ज उत्पादनांवर 12 EMI ची सूट देत आहे. आणि दुचाकी ग्राहकांना कोणत्याही प्रक्रिया शुल्काशिवाय कर्ज ऑफर करत आहे. बँक व्यावसायिक लोकांना मुदत कर्ज, उपकरणे कर्ज आणि व्यावसायिक वाहन कर्जावर अनेक फायदे देईल.
विशेष म्हणजे ‘दिल से ओपन सेलिब्रेशन्स: क्यूंकी दिवाळी रोज रोज नही आती’ या लाँच करण्याची घोषणा करताना, बँकेने सांगितले की, अॅक्सिस बँकेच्या डेबिट आणि क्रेडिट कार्ड्ससह रेस्टॉरंट्स आणि इतर किरकोळ कर्ज उत्पादनांवर केलेल्या खरेदीवर ऑफर आणि सूट देईल. तसेच 50 शहरांमधील निवडक 2,500 स्थानिक व्यापाऱ्यांकडून खरेदीवर ग्राहकांना 20 टक्के सूट मिळेल. याशिवाय स्टोअरमधून खरेदीवर या बँक ग्राहकांना 20 टक्के सूट मिळेल.