मुंबई – अॅमेझॉनचा ग्रेट इंडियन फेस्टिवल आणि फ्लिपकार्टचा बिग बिलियन डेज सेल दि. 3 ऑक्टोबर पासून सुरू होत आहे. या सणासुदीच्या विक्रीमध्ये स्मार्टफोनवर अनेक आकर्षक ऑफर्स आहेत. तसेच स्मार्टफोनवर प्रचंड सूट देण्यात आली ग्राहकांना 10,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीचा स्मार्टफोन मिळू शकतात. अमेझॉन आणि फ्लिपकार्ट सेलमध्ये 10,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत कोणते स्मार्टफोन खरेदी करू शकतात, ते जाणून घेऊ या…
अॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलमध्ये आपण Samsung Galaxy M12 स्मार्टफोन 9,499 रुपयांना खरेदी करू शकतात. Redmi 9A हा फोन 6,799 रुपयांना खरेदी करता येईल. तसेच Tecno Spart 7T हा फोन 8,499 रुपयांना मिळवू शकतो. तसेच टेक्नो स्पार्क गो 2021हा फोन 6,999 रुपयांना, टेकनो स्पार्क 7 7,499 रुपयांना आणि टेकनो स्पार्क 8 7,999 रुपयांना खरेदी करू शकता. तसेच अमेझॉनच्या ग्रेट इंडियन फेस्टिव्हलमध्ये एचडीएफसी बँकेच्या डेबिट व क्रेडिट कार्ड आणि ईएमआयवर 10 टक्के त्वरित सूट मिळेल.
फ्लिपकार्टची बिग बिलियन डेजची विक्री 3 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. फ्लिपकार्टच्या या उत्सवाच्या विक्रीपूर्वी 10,000 रुपयांखालील अनेक स्मार्टफोन उपलब्ध झाले आहेत. सॅमसंग गॅलेक्सी F12 हा 9,499 रुपयांच्या किंमतीत खरेदी करता येतो. फ्लिपकार्ट सेलमध्ये आपण Realme C21 Y हा 8,999 रुपयांना, Realme C20 फक्त 6,999 रुपयांमध्ये, Realme C21 हा फोन 9,499 रुपयांना खरेदी करू शकतात.
फ्लिपकार्ट सेलमध्ये Poco M3 स्मार्टफोन 9,499 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत खरेदी करू शकता. Poco C3 फक्त 6,999 रुपयांमध्ये मिळू शकतो. Oppo A33 फक्त 8,990 रुपयांमध्ये आणि Oppo A12 हा 8,490 रुपयांना मिळू शकतो. Infinix Hot 10 Playहा 7,999 रुपयांमध्ये, Infinix Smart 5A हा फोन 6,499 रुपयांमध्ये, Infinix Smart 5 हा 6,999 रुपयांमध्ये आणि Infinix Hot 10S हा 9,499 रुपयांमध्ये मिळू शकतो.
फ्लिपकार्ट सेलमध्ये आपण जिओनी मॅक्स 5,999 रुपयांना आणि जिओनी मॅक्स प्रो 6,999 रुपयांना खरेदी करू शकता. तसेच Z6 हा 9,699 रुपयांना, लावा Z2 मॅक्स फक्त 7,299 रुपयांमध्ये, लावा Z4 हा 8,799 रुपयांमध्ये आणि लावा Z2S फक्त 6,999 रुपयांना खरेदी करू शकता. तसेच मायक्रोमॅक्स इन नोट 1 हा फोन 9,499 रुपयांमध्ये मिळू शकतो. त्याचबरोबर मायक्रोमॅक्स IN 2b हा 8,499 रुपयांना खरेदी करता येईल.