विशेष प्रतिनिधी, मुंबई/नवी दिल्ली
भारतीय आयुर्विमा महामंडळाने (एलआयसी) ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. ग्राहक हक्क प्रकरणांचा (क्लेम) निपटारा प्रक्रिया सुलभ करण्यासाठी विविध नियम शिथिल करण्याची घोषणा केली आहे. एलआयसीच्या या निर्णयामुळे असंख्य ग्राहकांना मोठा फायदा होणार आहे.
एलआयसीने म्हटले आहे की, ग्राहकांच्या सुरक्षेचा विचार करता हे पाऊल उचलले गेले आहे. सध्याच्या परिस्थितीत एलआयसीने रुग्णालयात मृत्यू झाल्यास मृत्यूच्या दाव्यासाठी पालिका आयुक्तांनी दिलेल्या मृत्यूच्या दाखल्याच्या जागी इतर काही कागदपत्रे पर्यायी पुरावा म्हणून वापरण्यास परवानगी दिली आहे. तथापि, अन्य प्रकरणांमध्ये पूर्वीप्रमाणे नगरपालिका किंवा महापालिकेकडून देण्यात येणारे मृत्यू प्रमाणपत्र आवश्यक असेल.
एलआयसीने जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची सूट दि. १ ऑक्टोबर २०२१ रोजी भांडवल परत मिळविण्याच्या पर्यायासह माफ केली आहे. इतर प्रकरणांमध्ये विमा कंपनी ईमेलद्वारे सबमिट केलेले जीवन प्रमाणपत्र स्वीकारेल. तसेच एलआयसीने पॉलिसीधारकांना परिपक्वता किंवा सर्व्हायवल बेनिफिट क्लेम सेटलमेंटसाठी कोणत्याही जवळच्या एलआयसी कार्यालयात कागदपत्रे जमा करण्यास परवानगी दिली आहे.
पॉलिसीधारकांना कोरोना संसर्गामुळे क्लेम सेटलमेंटसाठी सर्व्हिस शाखेत कागदपत्रे सादर करण्यात अडचण लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे. एलआयसीने ग्राहकांच्या दाव्याच्या लवकर तोडगा काढण्यासाठी ग्राहकांना त्याच्या ग्राहक पोर्टलवर ऑनलाइन एनईएफटी रेकॉर्ड तयार आणि सादर करण्याची परवानगी दिली आहे.
सोमवारपासून ५ दिवसांचा आठवडा
१० मे पासून एलआयसी कार्यालये सोमवारी ते शुक्रवार दरम्यान सकाळी १० ते सायंकाळी ५.३० या वेळेत कार्यरत असतील. तसेच ग्राहकांना एखादी विमा पॉलिसी खरेदी करायची असेल किंवा नूतनीकरण प्रीमियम भरावा लागत असेल तसेच कर्जासाठी अर्ज करणे, प्रीपे कर्ज, पत्ता बदलणे, पॅन तपशील अद्ययावत करणे. याकरिता www.licindia.in वर लॉग इन करू शकता.