मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी शिंदे सरकारने आज मोठा निर्णय घेतला आहे. उद्यापासून होत असलेल्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळाची आज तातडीने बैठक झाली. त्यात विविध प्रकारचे निर्णय घेण्यात आले आहेत. त्यात एक महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आहे. त्यानुसार, राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी केंद्र शासनाच्या धर्तीवर महागाई भत्त्यात ३ टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. ही वाढ याच महिन्यापासून म्हणजेच ऑगस्ट २०२२ पासून रोखीने देण्यात येईल. यामुळे राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ३१ वरुन ३४ टक्के होणार आहे. राज्यातील हजारो कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. शिंदे सरकारने विविध घटकांसाठी निर्णय घोषित करण्याचा उपक्रम सुरू केला आहे. त्याअंतर्गतच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी निर्णय घेण्यात आला आहे.
https://twitter.com/mieknathshinde/status/1559576802846158848?s=20&t=Jh9sqgfwzPuSSQqz5jlWWw
Big Decision For State Government Employee
Maharashtra Government
DA Hike Dearness Allowance