शनिवार, सप्टेंबर 27, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

जीएसटीच्या स्लॅबमध्ये मोठा बदल…बघा, कोणत्या वस्तू होणार स्वस्त

by Gautam Sancheti
सप्टेंबर 4, 2025 | 6:41 am
in मुख्य बातमी
0
nirmal sitaraman


इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नवी दिल्लीत जीएसटी कौन्सिलच्या महत्त्वाच्या बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत जीएसटीच्या चार स्लॅबपैकी १२ टक्के आणि १८ टक्क्याचा स्लॅब रद्द करण्यात आला. त्यामुळे देशात आता फक्त ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच स्लॅब आता असणार आहे. या निर्णयामुळे इलेक्ट्रीक वस्तू, खाद्यपदार्थ, साबण, कपडे, पादत्राणे यासह रोजच्या वापराच्या गोष्टी स्वस्त होणार आहेत. सरकारचा हा निर्णय नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजे २२ सप्टेंबरपासून लागू होणार आहे.

याअगोदर १२ टक्के आणि २८ टक्के स्लॅब होता तो आता रद्द करण्यात आला. ज्या गोष्टींवर आधी २८ टक्के जीएसटी लागायचा. त्यावर आता १८ टक्के जीएसटी लागणार आहे. त्याचबरोबर ज्या गोष्टीवर आधी १२ टक्के जीएसटी लागायचा. त्यावर आता पाच टक्के जीएसटी लागणार आहे. तर काही वस्तूंवरील जीएसटी हा शून्य टक्के करण्यात आला आहे.

या निर्णय़ाबाबत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात पुढील पिढीतील जीएसटी सुधारणांची घोषणा केली होती. त्याच तत्त्वावर काम करत, जीएसटी परिषदेने महत्त्वपूर्ण सुधारणांना मान्यता दिली आहे. या सुधारणांमध्ये बहु-क्षेत्रीय आणि बहु-विषयगत लक्ष केंद्रित केले आहे, ज्याचा उद्देश सर्व नागरिकांसाठी राहणीमान सुलभ करणे आणि सर्वांसाठी व्यवसाय करणे सुलभ करणे आहे.

या वस्तू होणार महाग
लक्झरी वस्तू, कार आणि बाईक अधिक महाग होतील. कारण नव्या स्लॅबमध्ये यांना विशेष स्लॅब देण्यात आला आहे. तंबाखू, जर्दा, पान मसाला, फ्लेवर, फ्रूट ड्रिंक आणि इतर पॅकेज्ड पेये महाग होतील. ३५० सीसी पेक्षा जास्त इंजिन असलेल्या बाईक महाग होतील.

काय स्वस्त होणार
संगमरवरी, चामडे, शेतकरी आणि त्यांच्या उत्पादनांवर आकारण्यात येणारा १२ टक्के जीएसटी देखील ५ टक्के करण्यात आला आहे. आरोग्य विमा आणि जीवन विमा पॉलिसींवरील जीएसटीमध्येही मोठी सवलत देण्यात आली आहे. शूज आणि कपड्यांवरही मोठी सवलत देण्यात आली आहे. आता त्यावर १२ टक्क्यांऐवजी फक्त ५ टक्के जीएसटी आकारला जाईल. आरोग्य उपकरणे आणि ३३ औषधांवर जीएसटी आकारला जाणार नाही. चष्मा आणि दृष्टीशी संबंधित उपकरणांवरही ५ टक्के जीएसटी असेल. सुक्या मेव्यांवरील म्हणजेच काजू, बदाम, पिस्ता, खजूर, मिश्र काजू, नारळ पाणी, सोया मिल्क ड्रिंक, फळांच्या रसावर आधारित पेय, दुधावर आधारित पेय यासारख्या पॅकेज्ड पेय, पास्ता, नूडल्स, कॉर्नफ्लेक्स, फ्रूटेड राईस, बिस्किटे, केक, पेस्ट्री, नमकीन, भुजिया, इत्यादींवरील जीएसटी दर १२ टक्क्यांवरून वरून ५ टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आला आहे.

व्यापारातील सुलभतेविषयक उपाययोजनांसंबंधी या केल्या शिफारशी
​केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली वस्तू आणि सेवा कर (GST) परिषदेची 56 वी बैठक नवी दिल्ली इथे पार पडली. या बैठकीत वस्तू आणि सेवा कर (GST) कराच्या दरातील बदल, व्यक्तींना, सामान्य माणसांना, महत्त्वाकांक्षी मध्यमवर्गीयांना दिलासा देणार्‍या तसेच वस्तू आणि सेवा कराअंतर्गत (GST) व्यापारातील सुलभतेविषयक उपाययोजनांसंबंधी शिफारशी करण्यात आल्या.

सामान्य माणूस, कामगार-केंद्रित उद्योग, शेतकरी आणि शेती, आरोग्य, अर्थव्यवस्थेचे प्रमुख चालक यावर लक्ष केंद्रित करून जीएसटी परिषदेने दरांचे सुसूत्रीकरण करण्याला मंजुरी दिली

सामान्य माणसासाठी विमा परवडणारा बनवण्यासाठी आणि देशात विमा संरक्षण वाढवण्यासाठी सर्व वैयक्तिक आयुर्विमा पॉलिसी, टर्म लाइफ, युलिप किंवा एंडोमेंट पॉलिसी आणि रिइन्शुरन्स यावरील जीएसटीमधून सूट.

सामान्य माणसासाठी विमा परवडणारा बनवण्यासाठी आणि देशात विमा संरक्षण वाढवण्यासाठी सर्व वैयक्तिक आरोग्य विमा पॉलिसी (फॅमिली फ्लोटर पॉलिसी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या पॉलिसींसह) आणि त्यांचे रिइन्शुरन्स यावरील जीएसटीमधून सूट.

सध्याच्या चार-स्तरीय कर दर रचनेचे नागरिक-स्नेही ‘सोपा कर’ मध्ये सुसूत्रीकरण – 18% स्टॅण्डर्ड दर आणि 5% मेरिट दरासह 2 दराची रचना असेल ; काही निवडक वस्तू आणि सेवांसाठी 40% विशेष डी-मेरिट दर.

जीएसटी 18% किंवा 12% वरून 5% पर्यंत कमी करण्यात आला, ज्यामुळे केसांचे तेल, टॉयलेट सोप, शॅम्पू, टूथब्रश, टूथपेस्ट, सायकल, टेबलवेअर, किचनवेअर आणि इतर घरगुती वस्तू यांसारख्या सर्वसामान्य माणसाच्या वापरातील वस्तूंवरील कर कमी झाला.

अल्ट्रा-हाय टेम्परेचर (UHT) दूध, पॅकबंद आणि लेबल केलेले पनीर यांसारख्या काही वस्तूंवरील जीएसटी 5% वरून शून्य (NIL) करण्यात आला आहे.

सर्व भारतीय ब्रेड प्रकारांवरील (चपाती किंवा रोटी, पराठा, इत्यादी) जीएसटी शून्य करण्यात आला आहे.

जीएसटी 12% किंवा 18% वरून 5% पर्यंत कमी करण्यात आला आहे, ज्यामुळे जवळजवळ सर्व खाद्यपदार्थांवरील म्हणजे पॅकबंद नमकीन, भुजिया, सॉस, पास्ता, इन्स्टंट नूडल्स, चॉकलेट, कॉफी, संरक्षित मांस, कॉर्नफ्लेक्स, बटर, तूप, इत्यादीवरील कर कमी झाला.

एअर-कंडिशनिंग मशीन, 32 इंचा पर्यंतचे टीव्ही (सर्व टीव्ही आता 18% मध्ये), डिशवॉशिंग मशीन, लहान कार, 350 सीसी किंवा त्यापेक्षा कमी क्षमतेच्या मोटरसायकल यांसारख्या वस्तूंवरील जीएसटी 28% वरून 18% पर्यंत कमी करण्यात आला आहे.

ट्रॅक्टर, माती तयार करण्यासाठी किंवा लागवडीसाठी कृषी, फलोत्पादन किंवा वनीकरण यंत्रसामग्री, कापणी किंवा मळणीची यंत्रसामग्री, ज्यात गवत किंवा चारा गठ्ठा तयार करणारे, गवत किंवा गवत कापणी करणारे, खत तयार करणारे यंत्र इत्यादींचा समावेश असलेल्या कृषी वस्तूंवरील जीएसटी 12% वरून 5% पर्यंत कमी करण्यात आला आहे.

हस्तकला, मार्बल आणि ट्रॅव्हर्टाइन ब्लॉक्स, ग्रॅनाइट ब्लॉक्स आणि इंटरमीडिएट लेदर वस्तू यांसारख्या श्रम-केंद्रित वस्तूंवरील जीएसटी 12% वरून 5% पर्यंत कमी करण्यात आला आहे.

सिमेंटवरील जीएसटीमध्ये 28% वरून 18% पर्यंत कपात

33 जीवरक्षक द्रव्ये आणि औषधांवरील जीएसटी 12% वरून शून्य तर कर्करोग, दुर्मिळ आजार आणि इतर गंभीर जुनाट आजारांवर उपचार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या 3 जीवरक्षक द्रव्ये आणि औषधांवरील जीएसटी 5% वरून शून्य.

इतर सर्व द्रव्ये आणि औषधांवरील जीएसटीमध्ये 12% वरून 5% पर्यंत कपात

वैद्यकीय, शस्त्रक्रिया, दंत किंवा पशुवैद्यकीय वापरासाठी किंवा भौतिक किंवा रासायनिक विश्लेषणासाठी वापरल्या जाणाऱ्या विविध वैद्यकीय साधने आणि उपकरणांवरील जीएसटीमध्ये 18% वरून 5% पर्यंत कपात

विविध वैद्यकीय उपकरणे आणि पुरवठा उपकरणांवरील जीएसटी 12% वरून 5% पर्यंत कमी जसे की वॅडिंग गॉझ, बँडेज, डायग्नोस्टिक किट आणि अभिकर्मक, रक्तातील ग्लुकोज देखरेख प्रणाली (ग्लूकोमीटर) वैद्यकीय उपकरणे इत्यादी.

350 सीसी किंवा त्यापेक्षा कमी क्षमतेच्या छोट्या मोटारी आणि मोटारसायकलींवरील जीएसटीमध्ये 28% वरून 18% पर्यंत कपात

बस, ट्रक, रुग्णवाहिका इत्यादींवरच्या जीएसटीत 28% वरून 18% पर्यंत घट

कोणताही एचएस कोड असलेल्या मोटारगाड्यांच्या सर्व घटकांसाठी 18% चा एकसमान दर; तीन चाकी वाहनांसाठी 28% वरून 18% पर्यंत कपात

मानवनिर्मित फायबरवरील वस्तू आणि सेवा कर (GST) 18% वरून 5% पर्यंत कमी करून तसेच मानवनिर्मित धाग्यांवरील वस्तू आणि सेवा कर (GST) 12% वरून 5% पर्यंत कमी करून मानवनिर्मित वस्त्रोद्योग क्षेत्रातील प्रलंबित उलट्या कर रचनेच (inverted duty structure) दुरुस्ती केली.

​सल्फरिक ॲसिड, नायट्रिक ॲसिड आणि अमोनियावरील वस्तू आणि सेवा कर (GST) 18% वरून 5% पर्यंत कमी करून खत क्षेत्रातील उलट्या कर रचनेत (inverted duty structure) दुरुस्त केली.

​नवीकरणीय ऊर्जा उपकरणांवर आणि या उपकरणांच्या उत्पादनासाठीच्या सुट्या भागांवरचा वस्तू आणि सेवा कर (GST) 12% वरून 5% पर्यंत कमी केला.

​प्रति युनिट प्रति दिन 7,500 रुपये किंवा त्याहून कमी किमतीच्या हॉटेल निवास सेवांवरील वस्तू आणि सेवा कर (GST) 12% वरून 5% पर्यंत कमी केला.

​व्यायामशाळा, सलून, न्हावी, योगा केंद्रे इत्यादींच्या सेवांसह सामान्य व्यक्तींद्वारा वापरल्या जाणाऱ्या सौंदर्य आणि शारीरिक आरोग्याशी संबंधित सेवांवरील वस्तू आणि सेवा कर (GST) 18% वरून 5% पर्यंत कमी केला.

Gz79EhXWgAEkeWY
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

गेल्यावेळेस प्रश्न सोडवला होता ना, मग परत मराठा आंदोलन का? एकनाथ शिंदे यांना विचारा….राज ठाकरे यांची प्रतिक्रिया

Next Post

‘पीएसआय’ पदांसाठी विभागीय परीक्षा पुन्हा सुरू…पोलिस कर्मचाऱ्यांना अधिकारी होण्याची सुवर्णसंधी

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

Untitled 43
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक-वाढवण एक्स्प्रेस वे आणि फ्रेट कॉरिडॉर प्रकल्पास शासनाची तत्त्वतः मान्यता

सप्टेंबर 27, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींनी अनावश्यक खर्चावर लगाम घालावा, जाणून घ्या, रविवार, २८ सप्टेंबरचे राशिभविष्य

सप्टेंबर 27, 2025
rain1
संमिश्र वार्ता

परतीच्या मार्गांवरील मान्सून सप्ताहभर जागेवरच थबकणार…बघा, हवामानतज्ञांचा अंदाज

सप्टेंबर 27, 2025
jail11
संमिश्र वार्ता

नवी मुंबईत मोठी कारवाई…२६ लाखाच्या लाचखोरी प्रकरणात हा अधिकारी गजाआड

सप्टेंबर 27, 2025
Screenshot 20250927 184601 WhatsApp 1
संमिश्र वार्ता

नांदेड जिल्ह्यातील पूरग्रस्तांशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा व्हिडिओ कॉलद्वारे थेट संवाद साधला.

सप्टेंबर 27, 2025
fir111
क्राईम डायरी

कार खरेदी विक्रीत अशी केली आर्थिक फसवणूक…गुन्हा दाखल

सप्टेंबर 27, 2025
crime1
क्राईम डायरी

ग्रामपंचायतीत जाऊन ग्रामसेवकास जीवंत जाळण्याचा प्रयत्न… अवैध व्यवसाय बंद करण्याचा ठराव केल्याचा राग

सप्टेंबर 27, 2025
Untitled 42
संमिश्र वार्ता

राज्यात या आठ जिल्ह्यांसह सातारा, कोल्हापूर घाट परिसरात ऑरेंज अलर्ट

सप्टेंबर 27, 2025
Next Post
Maharashtra Police e1705145635707

‘पीएसआय’ पदांसाठी विभागीय परीक्षा पुन्हा सुरू…पोलिस कर्मचाऱ्यांना अधिकारी होण्याची सुवर्णसंधी

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011