इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय रिऍलिटी शो म्हणजे ‘बिग बॉस’. या घरातील वाद, लाड, प्रेम, रुसवे – फुगवे या सगळ्यात प्रेक्षकांना फारच इंटरेस्ट असतो. म्हणूनच या घरात कोण येणार आहे, याची सर्वांना फारच उत्सुकता असते. तसंच या घरातून कोण बाहेर जाणार आहे, किंवा गेले आहे याकडे देखील प्रेक्षकांचे लक्ष असते. अनेक लोकप्रिय कलाकार या कार्यक्रमात येत असल्याने हा कार्यक्रम प्रेक्षकांमध्ये अत्यंत लोकप्रिय आहे. नुकताच या शो मधून सायरस ब्रोचा बाहेर पडला आहे. त्यानिमित्ताने बिग बॉसच्या कॉन्ट्रॅक्टची चर्चा रंगते आहे.
कॉन्ट्रॅक्ट बंधनकारक
‘बिग बॉस’चा कोणताही शो साइन करण्यापूर्वी संबंधित कलाकार आणि चॅनल यांच्या दरम्यान एक कॉन्ट्रॅक्ट केले जाते. विशेषतः अशा रिॲलिटी शो चे कॉन्ट्रॅक्ट करताना चॅनलकडून अनेक कठोर नियम टाकले जातात. यातीलच एक महत्त्वाचा नियम म्हणजे स्पर्धेदरम्यान कलाकार हे घर सोडून जाऊ शकत नाही. यामुळेच सायरसने घराबाहेर जायचे ठरवले तेव्हा या कॉन्ट्रॅक्टचा मुद्दा समोर आला. तब्येतीच्या कारणास्तव सायरस सध्या घराबाहेर पडला आहे. मात्र आता आपल्याला घरात राहणे शक्य नसल्याचे त्याचे म्हणजे होते. त्याचा डायबिटीस बॉर्डर लाइनवर पोहोचल्यामुळे शो सोडू इच्छित असल्याचे सायरसने म्हटलं होतं.
घर सोडण्याचा सायरसचा हट्ट पाहून सलमान खानने त्याला कार्यक्रमापूर्वी केलेला करार मोडून दंड भरून बाहेर जायचे आहे का, असा प्रश्न विचारला. सलमानच्या या प्रश्नावर तो थोडा डगमगला. याला कारणही तसेच होते. बिग बॉसचे १२५ पानाचं कॉन्ट्रॅक्ट हे पाळण्यासाठी फार कठीण असतं. ते तोडण्याचा कोणी विचारही करत नाही. अनेक स्पर्धक कॅमेर्यासमोर शो सोडण्याची धमकी देत असेल तरी प्रत्यक्षात ती कधीच खरी होत नाही, याचे हेच कारण असावे. दरम्यान, सायरसपूर्वी अनेक स्पर्धकांनी हा शो सोडायचा प्रयत्न केला. मात्र, करारामुळे त्यांना पुन्हा या शोमध्ये यावं लागलं.
करार मोडल्यास
बिग बॉसच्या करारानुसार, स्पर्धकांना चॅनलने दिलेल्या वेळेच्या मर्यादेपर्यंत बिग बॉसच्या घरातच राहावे लागेल. स्पर्धक स्वतःच्या इच्छेने घराबाहेर जाऊ शकत नाहीत. मात्र स्पर्धकांनी करार मोडून घराबाहेर जायचं ठरवलं तर त्यांना 2 कोटी रुपयांपर्यंत दंड भरावा लागू शकतो. याशिवाय कॉन्ट्रॅक्ट तोडण्याचा परिणाम त्यांच्या मानधनावरही होतो. स्पर्धकांची तब्येत बिघडली, टास्क करताना त्यांना गंभीर दुखापत झाली, तर कलाकारांना करारातून दिलासा मिळतो. हिंसाचार केल्यासही शोमधून बाहेर पडावे लागते