इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – छोट्या पडद्यावरील सर्वाधिक वादग्रस्त आणि तेवढाच लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे ‘बिग बॉस’. या कार्यक्रमाचे चौथे पर्व नुकतेच सुरू झाले असून रविवारी या पर्वातील पहिले एलिमिनेशन पार पडले. अभिनेता निखिल राजेशिर्के याची या घरातून एक्झिट झाली आहे.
गांधी जयंतीपासून बिग बॉस मराठीचे नवीन पर्व सुरू झाले. ‘ऑल इज वेल’ या थीमवर आधारित असलेल्या या पर्वात तेजस्विनी लोणारी, प्रसाद जवादे, निखिल राजेशिर्के, किरण माने, अपूर्वा नेमळेकर, रुचिरा जाधव असे चर्चेतील कलाकार सहभागी झाले आहेत. नेहमीप्रमाणेच या घरातील सदस्यांमध्ये होणारे वाद, गॉसिप या गोष्टी सुरुवातीपासूनच पाहायला मिळाल्या.
खरं तर या घरात येणाऱ्या प्रत्येकालाच आपण शेवटपर्यंत या घरात रहावं, असं वाटत असत. पण ते काही शक्य नसत. आणि १६ तारखेच्या रविवारी बिग बॉस मधील पहिले एलिमिनेशन झाले आहे. अभिनेता निखिल राजेशिर्के याला या घरातून बाहेर जावं लागलं आहे. डेंजर झोनमध्ये अमृता धोंगडे, रोहित शिंदे, अमृता देशमुख, रुचिरा जाधव आणि निखिल राजेशिर्के हे पाच सदस्य असल्याचे महेश मांजरेकरांनी जाहीर केले. यानंतर यातील कोणता सदस्य घरात राहणार त्यांची नावे सांगण्यास महेश मांजरेकरांनी सुरुवात केली. सुरुवातीला महेश मांजरेकरांनी अमृता धोंगडे हिने नाव सेफ झोनमध्ये असल्याचे जाहीर केले.
त्या पाठोपाठ रोहित शिंदे, अमृता देशमुख या दोघांची नावे महेश मांजरेकरांनी जाहीर केली. यानंतर शेवटी रुचिरा जाधव आणि निखिल राजेशिर्के हे दोघेही डेंजर झोनमध्ये होते. अखेर महेश मांजरेकरांनी निखिल राजेशिर्के हा या घरातून बाहेर पडत असल्याचे जाहीर केले. यामुळे निखिलचा बिग बॉसच्या घरातील प्रवास इथेच संपला. ही घोषणा झाल्यानंतर घरातील सर्वजण भावूक झाले. यावेळी घरातील सदस्यांनी निखिलला भावूक होत मिठी मारली.
कार्यक्रम सुरू झाल्यापासून जवळपास २ आठवडे या घरातून कोणीच बाहेर पडले नव्हते. त्यामुळे आता या घरातून कोण बाहेर जाणार, याची प्रेक्षकांना उत्सुकता होती. मंचावर आल्यानंतर महेश मांजरेकरांनी निखिलचे तोंडभरुन कौतुक केले. तसेच तो कुठे चुकला याबद्दल त्याला सांगितले. ‘बाकी काहीही असू दे, घरातला हा बेस्ट माणूस होता’, अशा शब्दात महेश मांजरेकरांनी निखिलचे कौतुक केले.
Big Boss Marathi TV Reality Show Actor Left