इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – ‘बिग बॉस मराठी’ या शोचे आतापर्यंत ३ पर्व झाले असून आता चौथ्या पर्वाचे बिगुल वाजले आहे. हे पर्व लवकरच सुरू होणार असून त्याचा प्रोमोही रिलीज झाला आहे. या कार्यक्रमाच्या तीन सीझन्सला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली होती. विशाल निकम हा गेल्या सीझनचा विजेता ठरला होता. आता लवकरच या कार्यक्रमाचा चौथा सीझन प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. यावेळी महेश मांजरेकर हे सूत्रसंचालन करणार का याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. पण आता या सीझनचेसुद्धा मास्तर महेश मांजरेकर हेच असणार आहेत. महेश यांनी बिग बॉस मराठीच्या तीन सीझन्सचे सूत्रसंचालन केले होते. नुकताच या सीझनचा एक नवा प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.
https://twitter.com/bb_marathi_4/status/1563564596744826889?s=20&t=IyHXwQpWVdu2a5cOM6I8Xw
‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या सीझनचा प्रोमो कलर्स मराठीच्या पेजवरुन शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये महेश मांजरेकर यांचा हटके लूक दिसत आहे. डोक्यावर हॅट, निळा कोट आणि मफलर अशा लूकमध्ये महेश मांजरेकर दिसत आहेत. प्रत्येक सीझनमध्ये महेश मांजरेकर हे आपल्या हटके लूकने चर्चेत होते. तर मागच्या सीझनमध्ये ते एका गंभीर आजारावर मात करून आले होते.
https://twitter.com/ColorsMarathi/status/1564130610318168065?s=20&t=IyHXwQpWVdu2a5cOM6I8Xw
”हिची ना कायम किरकीर असते, हा किती भांडतो, सर तिच्यावर कायम चिडतात, हा सरांचा फेव्हरेट आहे. ही सगळी माझी नाही तर तुमची मत आहेत. बिग बॉस मराठी ४ सुरू होतंय. तुमची मत तयार ठेवा’, असं महेश मांजरेकर या प्रोमोमध्ये म्हणताना दिसत आहेत. ‘कधी रिलीज होणार आहे’, ‘आम्ही या सीझनची वाट बघत आहोत’ अशा कमेंट्स या प्रोमो व्हिडीओला नेटकऱ्यांनी केल्या आहेत. या सीझनमध्ये कोणते स्पर्धक असतील? हा सीझन सुरु कधी होईल? या प्रश्नांचे उत्तर लवकरच प्रेक्षकांना मिळणार आहे.
https://twitter.com/ColorsMarathi/status/1551206279276040192?s=20&t=IyHXwQpWVdu2a5cOM6I8Xw
महेश मांजरेकर दर आठवड्याच्या शेवटी स्पर्धकांची शाळा घेत असतात. त्यांचा वीकेंडचा डाव या कार्यक्रमात रंगत आणतो. आठवड्याच्या शेवटी स्पर्धकांची शाळा घेण्यासाठी महेश मांजरेकर २५ लाख रुपये आकारतात अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे ते बिग बॉस या कार्यक्रमासाठी कोटींच्या घरात मानधन घेत असून नव्या पर्वासाठी त्यांच्या मानधनात आणखी वाढ झाली असावी अशी शक्यता वर्तवली जात आहे.
https://twitter.com/BhavBrahma/status/1564499653638631424?t=MB4GmbQnjDsEHKRPyhdezg&s=19
Big Boss Marathi Season 4 Promo
Entertainment Colors Marathi Mahesh Manjrekar Reality Show TV