इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – छोट्या पडद्यावरील सगळ्यात मोठा आणि वादग्रस्त रिऍलिटी शो म्हणजे ‘बिग बॉस’. हा कार्यक्रम लोकांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. ‘बिग बॉस १६’ हा शो आता चांगलाच रंगात आला आहे. या शोमधील बहुचर्चित स्पर्धक म्हणजे शालीन भानोत. शोच्या पहिल्या आठवड्यापासूनच तो चर्चेत आहे. त्याने घरातील सदस्य सौंदर्या शर्माच्या अंतर्वस्त्रांवर अप्रत्यक्षपणे कमेंट केली होती. इतकंच नव्हे तर तिच्याकडे किसही मागितला. हे सारं सुरू असताना त्याचं नाव ‘बिग बॉस’च्या घरातील सुंबुल तौकीर आणि टीना दत्ता यांच्याशी जोडलं गेलं आहे. आता मात्र एक वेगळंच चित्र तयार झालं आहे.
यापूर्वी सुंबुलला शालीन आवडत असल्याची चर्चा होती. सुंबुलच्या वडिलांनी ‘बिग बॉस १६’मध्ये येत तिला याबाबत समजावलं होतं. पण तिने वडिलांचंही काहीही ऐकलं नाही. आता शालीनने तिला नॉमिनेट केल्यानंतर या दोघांच्या नात्यामध्ये दुरावा निर्माण झाला आहे.
शिव ठाकरे आणि सुंबुल या दोघांपैकी एका व्यक्तीचं नाव नॉमिनेशनसाठी घ्यायचं होतं. यावेळी शालीन फक्त सुंबुलचंच नाव घेत होता. सुंबुलला काही हे पटलं नाही आणि यावरूनच शालीन-सुबुंलमध्ये वादाची ठिणगी पडली. ‘कलर्स हिंदी वाहिनी’ने शेअर केलेल्या प्रोमोमध्ये दोघंही भांडताना दिसत आहेत. सुबुंलला सुरक्षित केलं पाहिजे असं तुला एकदाही सांगावं वाटलं नाही. सारखी माझी परीक्षा घेऊ नका. असं सुंबुल शालीनला सांगते. यावर शालीन तिला उलट-सुलट उत्तरे देतो. “अबे येडी, तुम्हे समझ नहीं आ रहा है क्या” असे शालीन तिला सांगतो. याच भांडणादरम्यान मला तुझी गरज नसल्याचे शालीन याने तिला सुनावले. शालीनचं हे वागणं प्रेक्षकांना अजिबात पटलं नाही. म्हणूनच त्याला घरामधून बाहेर काढा अशी मागणी प्रेक्षक सध्या करत आहेत.