सिद्धी दाभाडे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
ज्या क्षणाची अनेक जण वाट पाहत आहेत तो क्षण अखेर आला आहे. बिग बॉस 15 च्या ग्रँड फिनाले मध्ये अवघे सहा स्पर्धक शिल्लक आहेत. आज सायंकाळी ‘बिग बॉस १५’चा विजेता ठरणार आहे. बिग बॉसचा हा १२० दिवसांचा प्रवास कुटुंबातील सर्व सदस्यांसाठी चढ-उतारांनी भरलेला होता. या सिझनमध्येही चाहत्यांची उत्कंठा शिगेला पोहचली आहे. बिग बॉस ट्रॉफीसह विजेता किती रोख बक्षीस जिंकेल हे सलमान खानने शेवटी उघड केले.
बिग बॉस सुरू झाला तेव्हा घराचे दोन भाग झाले होते. कुटुंबातील सर्व सदस्यांना जंगलात रहावे लागले. बिग बॉसने पुन्हा एकदा कुटुंबाला त्यांची गमावलेली बक्षीस रक्कम जिंकण्याची संधी दिली. वाइल्ड कार्ड एंट्रीसोबतच, कुटुंबातील सदस्यांनी टास्क जिंकून बक्षिसाची अर्धी रक्कम कमावली, त्यानंतर सलमान खान स्वतः घरात आला आणि घरातल्या सदस्यांना उरलेली बक्षिसाची रक्कम कमावण्याची संधी दिली. त्यानंतर तिसर्यांदा आरजे पलक आणि करण यांनी सर्व प्रश्नांची सदस्यांनी अचूक उत्तरे देऊन ती परत जिंकली.
https://twitter.com/BiggBoss/status/1487453541367447552?s=20&t=JbHhMRYp-KZKn1EnvQfB6g
रश्मी देसाई बाहेर पडल्यानंतर घरात फक्त पाच स्पर्धक उरले आहेत. जुन्या सिझनमधील पाच विजेते गौहर खान, रुबिना दिलायक, उर्वशी ढोलकिया, गौतम गुलाटी आणि श्वेता तिवारी हे उर्वरित पाच स्पर्धकांसाठी एक नवीन ऑफर घेऊन आले आहेत. ज्यामध्ये सदस्याने आहे त्या टप्प्यावर शो सोडल्यास त्याला10 लाखांची रक्कम देण्यात येईल. आता यापैकी कोणता स्पर्धक ही ऑफर स्वीकारतो, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
बिग बॉसच्या ग्रँड फिनालेसह, सलमान खानने देखील खुलासा केला की शोच्या विजेत्याला बक्षिस रूपात मोठी रक्कम मिळणार आहे. घरामध्ये उपस्थित असलेल्या सदस्य रश्मी देसाई, तेजस्वी प्रकाश, निशांत भट्ट, प्रतीक सहजपाल आणि करण कुंद्रा यांच्यापैकी जो विजेता होईल त्याला मानाची बिग बॉस ट्रॉफी मिळेल. त्यासह तब्बल 50 लाख रुपयांची मोठी रक्कम मिळेल.