मुंबई – सध्या टीव्ही वाहिन्यांवरील अनेक कार्यक्रम गाजत असतात. काही कार्यक्रम अत्यंत लोकप्रिय होतात. तर काही वादग्रस्त ठरतात. त्यापैकीच वादग्रस्त करणारा एक रियालिटी शो म्हणजे बिग बॉस होय. अनेक कारणांनी हा शो गाजत असतो. प्रत्येक शोमध्ये काही तरी वाद होऊन चर्चा रंगते. सध्या या शोचा पंधरावा सीजन चालू असून कमी टीआरपी मिळाल्यामुळे हा शो नियोजित वेळेपूर्वी बंद करण्यात येणार असल्याचे समजते.
बिग बॉस हा टीव्हीचा सर्वात वादग्रस्त रिअॅलिटी शो असून त्याचा चाहतावर्ग देखील वेगळा आहे. सध्या या शोचा १५वा सीझन सुरू आहे, ज्यामध्ये निर्मात्यांनी अनेक मोठे चेहरे आणले आहेत. हा सीझन सुरू होऊन आता पाच आठवडे झाले आहेत. तर करण कुंद्रा, तेजस्वी प्रकाश, जय भानुशाली यांसारखे टीव्हीवरील प्रसिद्ध चेहरे या घरात भांडणे आणि मारामारी करत आहेत, परंतु असे असूनही, बिग बॉसचा हा सीझन वेगळे काही दाखवण्यात अक्षम आहे. त्यामुळे शोचा टीआरपी गेल्या सीझनपेक्षा खूपच कमी येत आहे.
बंद होऊ शकतो कारण
बिग बॉस सीझन 15 ची लोकप्रियता प्रेक्षकांमध्ये कमी होत आहे. याच कारणामुळे निर्मात्यांनी आता हा शो बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. शोच्या घटत्या टीआरपीमुळे, निर्माते हा सीझन लवकरच संपू देणार आहेत आणि त्याचे नियोजन देखील सुरू झाले आहे.
टीआरपीमध्ये मोठी घसरण
एका टिव्ही रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आला आहे की, सलमान खानच्या फीसह शोचे बजेट 500 कोटींवर पोहोचले आहे आणि जंगल थीममुळे शोवर बराच खर्च करण्यात आला आहे. तसेच वीकेंडलाही शोला टीआरपी मिळत नाही. गेल्या आठवड्यात शोला फक्त 1 टीआरपी मिळाला आणि यामुळे निर्माते नाराज आहेत. अशा परिस्थितीत लवकरच निर्माते शो बंद करण्याचा निर्णय घेऊ शकतात.
कंटाळवाणा खेळ
बिग बॉसचा ग्रँड फिनाले फेब्रुवारी महिन्यात होतो आणि या सीझनचा फिनालेही पुढच्या वर्षी म्हणजेच 2022 च्या फेब्रुवारी महिन्यात ठेवण्यात आला होता, परंतु ज्या प्रकारे निर्मात्यांना या शोचा टीआरपी हवा होता, तो या सीझनमध्ये देऊ शकत नाही किंवा स्पर्धक घरातील त्यांचा खेळ बदलत नाहीत, त्यामुळे निर्माते हा सीझन फेब्रुवारीपूर्वी संपवातील.
वाईल्ड कार्डचा सट्टाही फसला
विशेष म्हणजे निर्मात्यांनी राकेश बापट आणि नेहा भसीन यांची वाइल्ड कार्ड एन्ट्री घरात करून घेतली. निर्मात्यांना विश्वास होता की शोमध्ये जाऊन दोघेही घरातील वातावरण बदलतील आणि शोमध्ये जीवंतपणा आणतील. पण तसे झाले नाही. राकेश बापट तब्येतीच्या कारणास्तव बाहेर गेले आहेत आणि नेहा भसीनही फारशी कमाल दाखवू शकली नाही. त्यामुळे दर्शक किंवा प्रेक्षक या हंगामातील लाइफ फील्ड शो पाहण्यात देखील रस दाखवत नाही.
अफसाना खान बाहेर
एपिसोडमध्ये अफसाना खानला बिग बॉसच्या घरातून बाहेर काढण्यात आले आहे. टास्क दरम्यान त्याला पॅनीक अटॅक आला, त्यामुळे त्याने घरातील चाकू उचलला. यानंतर त्याला शोमधून बाहेर फेकण्यात आले. दुसरीकडे राकेशही शोमधून बाहेर पडला आहे. अशा परिस्थितीत, या आठवड्यात दोन स्पर्धक स्पर्धतून बाहेर काढण्यापूर्वीच बाहेर पडले आहेत.