सिद्धी दाभाडे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
बिग बॉस 15 चा फिनाले जवळ येऊन ठेपल्याने प्रेक्षकांच्या मनातली उत्सुकता वाढली आहे. आता प्रत्येकजण हे जाणून घेण्यास उत्सुक आहे की कोणत्या स्पर्धकाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत? या रिअॅलिटी शोचा विजेता प्रतिक सहजपाल ठरण्याची दाट शक्यता आहे. ते का हेच आपण आता जाणून घेणार आहोत.
मनापासून खेळ
प्रतिक सहजपाल मनापासून खेळ खेळत आहे, हेच सर्वात महत्त्वाचे आहे. बिग बॉस ओटीटीच्या वेळेपासून प्रतिकलने बिग बॉस 15 मध्ये दिसण्याची स्वप्ने पाहण्यास सुरुवात केली. त्याच्या डोळ्यातील चमक दाखवते की हा शो त्याच्यासाठी किती अर्थपूर्ण आहे.
जबरदस्त फॅन
बिग बॉस ओटीटीमध्ये येण्यापूर्वीच प्रतीक सहजपाल तरुणांमध्ये प्रसिद्ध होता. पण त्यानंतर अनेक जण त्याला ओळखू लागले. प्रतिक हा बिग बॉस 15 चा विजेता ठरेल, असे सामान्यांसोबतच चित्रपट आणि टीव्ही इंडस्ट्रीशी संबंधित अनेक सेलिब्रिटी सांगत आहेत.
खूपच निडर
बिग बॉस 15 च्या सुरुवातीपासून प्रतिकने प्रत्येक टास्कमध्ये धैर्य दाखवले आहे. तो खूप निडर आहे आणि तो जे काही बोलतो ते कोणालाही न घाबरता बिनधास्तपणे सर्वांसमोर मांडतो. त्यामुळेच प्रतिक सहजपालची फॅन फॉलोइंग दिवसेंदिवस वाढत आहे.
मनाने स्वच्छ
प्रतिक सहजपालचा सर्वात मोठा गुण म्हणजे तो अत्यंत स्वच्छ मनाचा आहे. या कारणास्तव, प्रतिकला घरात फारसे मित्र नाहीत. कारण तो सर्व काही तोंडावर सांगतो. मनात काहीही ठेवत नाही. प्रतिकने प्रत्येक नातं खूप छान निभावलं आहे. अगदी मैत्रीतही आणि शत्रुत्वातही.
सर्वात जास्त कंटेंट
प्रतिक सहजपालने या शोमध्ये सुरुवातीपासूनच मेकर्सला भरपूर कंटेंट दिला आहे. मग ते टास्कमध्ये मुद्दा मांडायचा असो किंवा एखाद्या गोष्टीवर बोलणे असो… प्रतिकने निर्मात्यांना प्रत्येक प्रकारे संपूर्ण कंटेंट दिला आहे. आणि ही गोष्ट बिग बॉस 15 चे निर्माते देखील नाकारू शकत नाहीत.
आता या गुणांमुळे प्रतिक फिनालेच्या दिवशी बिग बॉस 15 ची ट्रॉफी जिंकतो का? याची उत्सुकता सर्वांनाच आहे.