इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – अतिशय उत्कंठावर्धक झालेल्या बिग बॉस १५ या रियालिटी शोची चमचमती ट्रॉफी अखेर तेजस्वी प्रकाशने जिंकली आहे. तर, विजेतेपदाच्या शर्यतीत अग्रेसर असलेला प्रतिक सहजपाल हा उपविजेता ठरला आहे. कलर्स वाहिनीवरील या ग्रँड फिनालेची सांगता रात्री उशीरा झाली.
तब्बल चार महिन्यांनंतर बिग बॉस 15 अखेर संपुष्टात आले. ग्रँड फिनाले दोन दिवस घेण्यात आला. बिग बॉसची ट्रॉफी कोण जिंकणार याची सर्वांना उत्सुकता होती. अखेर तेजस्वी प्रकाशने विजेतेपद पटकावून अन्य स्पर्धकांवर मात केली. तसेच प्रतीक सहजपाल याने प्रथम तर करण कुंद्राने द्वितीय उपविजेते पद पटकावले. अशाच प्रकारे शोचे टॉप 5 सपर्धक असलेल्या शमिता शेट्टीला चौथे स्थान मिळाले आहे. निशांत भटने 10 लाखांसोबत घराचा निरोप घेण्याचे पसंत केले. रश्मी देसाईही ग्रँड फिनालेच्या पहिल्याच दिवशी बाहेर पडली.
अभिनेता सलमान खानने ग्रँड फिनाले होस्ट केला. यंदाचे वैशिष्ट्य म्हणजे, गौतम गुलाटी, रुबिना दीलायक, श्वेता तिवारी, उर्वशी ढोलकिया आणि गौहर खान या मागील सिझनच्या विजेत्यांनी ग्रँड फिनालेमध्ये सादरीकरण केले. गेहराईंया चित्रपटाचे कलाकार दीपिका पदुकोण, अनन्या पांडे, सिद्धांत चतुर्वेदी आणि धैर्य करवा यांच्याशी सलमानने ग्रँड फिनालेमध्ये संवाद साधला. दिवंगत सिद्धार्थ शुक्ला यांना भावपूर्ण श्रद्धांजली देणार्या शहनाज गिलचेही मंचावर स्वागत केले गेले. तेजस्वी, करण, शमिता, प्रतीक, निशांत आणि रश्मी यांचा बिग बॉसच्या घरात अविश्वसनीय प्रवास झाला.
लखलखत्या विजेत्याच्या ट्रॉफीसोबतच तेजस्वी प्रकाशला 40 लाख रुपये बक्षीस म्हणून मिळाले. खास म्हणजे, एकता कपूरचा लोकप्रिय शो नागिन 6 ची मुख्य भूमिका देखील तेजस्वी प्रकाशला मिळाली आहे. तेजस्वीला बिग बॉसच्या घरात जिवलग मित्रांसोबत, करण कुंद्राच्या रुपात प्रियकर सुद्धा भेटला आहे. तेजस्वी आणि करण यांना #TejRan म्हणून प्रेक्षकांकडून खूप प्रेम मिळाले.
विजेता पद पटकवल्यानंतर तेजस्वी प्रकाशच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर सेलिब्रेशन करायला सुरुवात केली आहे. बिग बॉस 15 च्या सुरुवातीपासूनच तेजस्वी प्रकाशने आपल्या शानदार खेळ व नियोजनाने चाहत्यांची मने जिंकली. बिग बॉस 15च्या घराबाहेरही तेजस्वी प्रकाशचे बरेच फॅन फॉलोइंग आहेत. ‘सिलाला बदलते रिश्तों-2’ पासून खतरों के खिलाड़ी , ‘स्वारागिनी’ आणि ‘पहरेदार पिया की’ अशा अनेक शोजमध्ये तिने उत्तम कामगिरी केली आहे. बिग बॉस 15 मध्ये प्रवेश केल्यावर तिच्या चाहत्यांची संख्या 10 पट झाली आहे. ती निश्चितपणे दर्शकांची आवडती स्पर्धक आहे. एकीकडे तेजस्वी प्रकाशचे चाहते आनंद साजरा करत आहेत. तर, प्रतीक सहजपालचे चाहते मात्र निराश झाले आहेत. बिग बॉस 15 ची ट्रॉफी त्याच्या नावावर असेल असे प्रतिकचे चाहते गृहीत धरत होते, पण तसे झाले नाही.