सिद्धी दाभाडे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
लोकप्रिय रिअॅलिटी शो बिग बॉस 15 च्या ग्रँड फिनाले आता सुरू होत आहे. या शोचा विजेता अवघ्या काही तासांमध्ये कळणार आहे. बिग बॉस 15 चा हा सिझन सर्व स्पर्धकांसाठी चढ-उतारांनी भरलेला होता. या सिझनमध्ये काही जुने चेहरे दिसले, तर काही नवीन चेहऱ्यांनीही या शोमध्ये चांगलाच धुमाकूळ घातला. यावेळी सर्वच प्रेक्षक यंदाच्या ट्रॉफीवर कोणाचा हक्क असेल हे जाणून घेण्यासाठी वाट पाहत आहेत,. यंदाच्या ग्रँड फिनालेमध्ये अनेक स्टार्स त्यांच्या कामगिरीने आणि उपस्थितीने शो मध्ये चार चाँद लावतांना दिसतील.
बिग बॉसचे निर्माते या सिझनचा ग्रँड फिनाले संस्मरणीय बनवण्यासाठी कोणतीही कसर सोडत नाहीत. काही दिवसांपूर्वी कलर्सने आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितले होते की या सीझनच्या ग्रँड फिनालेमध्ये जुन्या सीझनचे विजेते येणार आहेत. आता उर्वशी ढोलकियापासून श्वेता तिवारी आणि रुबिना दिलीकपर्यंत अनेक कलाकार त्यांच्या आवडत्या स्पर्धकांना सपोर्ट करताना दिसतील.
श्वेता तिवारी बिग बॉसच्या मंचावर पोहोचली आणि तिच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे, तिला मीडियाने घेरले गेले. फोटोग्राफर विरल भयानी यांनी हे सर्व व्हिडिओ आपल्या सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. जिथे बिग बॉस सीझन 6 ची विजेती आणि छोट्या पडद्यावरील स्टार कोमोलिका, श्वेता तिवारी आणि रुबिना दिलीक फिनालेसाठी शूट करण्यासाठी सेटवर पोहोचल्या. उर्वशी आणि रुबिना दिलैकने कॅमेऱ्यासाठी जोरदार पोज दिली, तर श्वेता तिवारी तिच्या वक्तव्यानंतर मीडिया कॅमेरा टाळताना दिसली.
https://twitter.com/indiaforums/status/1487340694393868288?s=20&t=iwVY1HdXK9QYpjJeWhTsQA
फिनालेच्या शर्यतीत खेळातून बाहेर पडलेली अभिनेत्री राखी सावंतही पती रितेशसोबत बिग बॉसच्या सेटवरहजेरी लावतांना दिसली. जिथे तिने कॅमेऱ्यासाठी अनेक पोज दिल्या. राखी सावंत पती रितेशसोबत बिग बॉसच्या मंचावर परफॉर्म करताना दिसणार असल्याचे वृत्त आहे. बिग बॉस 15चा ग्रँड फिनाले २९ आणि ३० जानेवारी असे दोन दिवस प्रसारित केला जाणार आहे.