मुंबई – टोकियो ऑलिम्पिकमध्ये भालाफेक स्पर्धेत भारताला सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या नीरज चोप्राचे अभिनंदन करणारे ट्विट बीग बी अमिताभ बच्चन केले. यासंदर्भात त्यांनी एक कार्टुन व्हिडिओ ट्विट केला. त्याचा खरपूस समाचार नेटकऱ्यांनी घेतला आहे. त्यामुळेच अमिताभ सध्या सोशल मिडियावर ट्रोल होत आहेत.
संपूर्ण देशासाठी सुवर्णपदक जिंकणाऱ्या नीरज चोप्रा याच्या विजयाचा आनंद सर्वत्र साजरा करण्यात आहे. बॉलिवूड मधील अनेक दिग्गज अभिनेते देखील नीरजच्या या नेत्रदीपक विजयाबद्दल अभिनंदन करत आहेत. मात्र बॉलिवूडचे बीग बी अभिनेते अमिताभ बच्चन यांना नीरज चोप्राच्या या विजयाचे अभिनंदन करणे चांगलेच महागात पडले आहे.
वास्तविक अभिनेते बच्चन हे सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. ते अनेकदा त्याच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी काही चित्रे आणि व्हिडिओ देखील शेअर करतात. मात्र नुकत्यात केलेल्या या ट्विटमध्ये अमिताभ यांनी भारताची लोकसंख्या १३० कोटीऐवजी १०३ कोटी लिहिली. यावर नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल करायला सुरुवात केली.
एका ट्विटरकर्त्याने लिहिले की, साहेब १०३ कोटी? लोकसंख्या हे कोणत्या विद्यापीठातील ज्ञान प्राप्त झाले आहे, आणि उरलेल्या २७ कोटी लोकांना नायजेरियात पाठवण्यात आले आहे काय? खरे म्हणजे बॉलिवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन ७० च्या दशकापासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत असून अद्यापही ते प्रेक्षकांचे आवडते आहेत. तसेच त्याच्या वयाचे अनेक अभिनेते चित्रपट जगतापासून दूर असताना, बिग बी अजूनही खूप सक्रीय आहेत. विशेष म्हणजे वयाची सत्तरी ओलांडल्यानंतरही त्याचा उत्साह कमी झाला नाही. अजूनही ते उत्तम भूमिका साकारतात. सोशल मीडियावर ते सक्रिय असतात. दररोज काही ना काही पोस्ट चाहत्यांसोबत शेअर करतात. बिग बी लवकरच ‘झुंड’ आणि ‘मेदे’ चित्रपटांमध्ये दिसणार आहेत. याशिवाय अमिताभ बच्चन कौन बनेगा करोडपतीच्या १३ व्या सीझनला होस्ट करत आहेत.
https://twitter.com/SrBachchan/status/1424986066683973632