विशेष प्रतिनिधी, मुंबई
श्रीमंत लोकांकडे म्हणजे उद्योजक असो की अभिनेता किंवा क्रिकेटपटू यांच्याकडे किती संपत्ती आहे, याची सर्वसामान्य नागरिकांना नेहमीच उत्सुकता असते. बीग बी म्हणजेच लोकप्रिय आणि प्रसिद्ध चित्रपट अभिनेता अभिताभ बच्चन यांची संपत्ती किती आहे हे आता जाणून घेऊ या…
अमिताभ बच्चन यांनी अभिनेता म्हणून विविध हिंदी चित्रपटांमध्ये महत्वाची भूमिका केली आहे. त्यांचे अनेक चित्रपट रसिक प्रेक्षकांना खूप आवडतात. त्यामुळेच ते एक लोकप्रिय कलाकार म्हणून संपूर्ण भारतासह अन्य देशात आजही ओळखले जात आहेत. अमिताभ बच्चन यांची मुंबई व्यतिरिक्त परदेशात देखील अनेक मालमत्ता आहेत. अमिताभ बच्चन यांनी अलीकडेच मुंबईत ५,७०४ चौरस फूट डुप्लेक्स फ्लॅट ३१ कोटी रुपयांमध्ये खरेदी केला असून तो ३४ मजली इमारतीच्या २७ व्या आणि २८ व्या मजल्यावर आहे.
या शिवाय अमिताभ बच्चन यांचेही अनेक बंगले असून सध्या ते जुहूतील जलसा या बंगल्यात राहतात. हा दोन मजली बंगला अमिताभ बच्चन यांनी एन.सी. सिप्पी यांच्याकडून विकत घेतला होता. सदर बंगला १०,१२५ चौरस फूट आहे. अमिताभ बच्चन यांनी जलसाच्याच मागे ८,००० चौरस फूट असलेली आणखी एक मालमत्ता २०१३ मध्ये खरेदी केली असून त्याची किंमत ५० कोटी होती.
अमिताभ बच्चन यांचे कार्यालय जनक या बंगल्यात असून त्यांनी २००४ मध्ये ५० कोटी रुपयात विकत घेतले होते. अनेक वेळा अमिताभ येथे जावई नंदा यांच्या समवेत दिसतात. हा बंगला देखील जुहूमध्येच आहे. खरे म्हणजे हा बंगला अमिताभ बच्चन यांच्या वडीलोपार्जित मालकीचा आहे. १९७६ मध्ये बच्चन कुटुंबाने हे घर विकत घेतले होते. विशेष म्हणजे ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांचे २००७ मध्ये याच बंगल्यात लग्न झाले होते. या शिवाय त्यांचा वत्स हा आणखी एक बंगला जुहू येथेच असून सध्या बच्चन यांनी तो सिटी बँकला भाड्याने दिला आहे.
प्रयागराजमध्येही अमिताभ बच्चन यांची वडिलोपार्जित संपत्ती असून ती आता शैक्षणिक ट्रस्टमध्ये रूपांतरीत गेली आहे. गुडगावमध्ये त्यांचा फ्लॅटही आहे. अमिताभ बच्चन आणखी तीन अपार्टमेंट असून त्याची एकूण किंमत ४२ कोटी रुपये आहे. विशेष म्हणजे फ्रान्सची राजधानी पॅरिस येथे देखील अमिताभ बच्चन यांचे अलीशान घर असून त्यांना ते त्यांच्या पत्नी जया बच्चन यांनी भेट म्हणून दिले होते.