मुंबई – कोट्यवधी चाहत्यांच्या गळ्यातील ताईत असलेले महानायक अमिताभ बच्चन यांनी आज एक मोठी घोषणा केली आहे. छोट्या पडद्यावरील त्यांच्या सर्वाधिक लोकप्रिय कार्यक्रम असलेला कौन बनेगा करोडपती हा पुन्हा येत आहे. आतापर्यंत या शो चे तब्बल १२ भाग झाले आहेत. आता तेरावा शो पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. केवळ ज्ञानाच्या जोरावर कोट्यधीश बनण्याची संधी देणारा हा शो अत्यंत लोकप्रिय आहे. तसेच या आलिशान शो मध्ये जाणे, अमिताभ यांना भेटणे आणि त्यांच्यासोबत हॉट सीटवर बसणे असे अनेकांचे स्वप्न असते. ते या शो च्या निमित्ताने पूर्ण होत असते. सोनी टीव्हीवर हा शो पुन्हा येणार असून त्याचा एक व्हिडिओ अमिताभ यांनी शेअर केला आहे. बघा हा व्हिडिओ
https://twitter.com/SrBachchan/status/1417040625350832129