मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – प्रत्येक व्यक्तीला जीवनात सुरुवातीच्या काळात सहज यश मिळत नसते, थोडे जण असे नशीबवान असते असतात की, त्यांना सहजासहजी यश मिळते. अन्यथा बहुतांश जणांना स्ट्रगल करावे लागते. बॉलिवूड म्हणजेच हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकारांना देखील या स्ट्रगलचा सामना करावा लागतो. बिग बी अमिताभ बच्चन यांना देखील मुंबई येथे आल्यावर अनेक संकटांना तोंड द्यावे लागले होते.
मोठमोठे हिट चित्रपट देऊन बॉलिवूडमधील काही कलाकार रातोरात स्टार बनतात. पण असे असूनही, त्यांना त्यांची लोकप्रियता टिकवून ठेवण्यासाठी अनेक जाहिराती आणि ब्रँड भागीदारी देखील करावी लागते. पण पूर्वीच्या काळी असे नव्हते. बॉलीवूडचे मोठे नाव असलेले आणि आता टीव्हीवर अनेक जाहिरातींमध्ये दिसणारे अमिताभ बच्चन जाहिराती करण्यास टाळाटाळ करत होते.
खूप वर्षापूर्वी अभिताभ बच्चन हे कलाकार होण्यासाठी मुंबईत दाखल झाले होते. मात्र त्यांना कोणतीही जाहिरात किंवा अॅड. करायची नव्हती. त्यांना रस्त्यावर झोपावे लागले किंवा टॅक्सी चालवून उदरनिर्वाह करावा लागला तरी त्यांना जाहिरात करण्याची इच्छा नव्हती. त्यानंतर खूप काळाने त्यांना प्रचंड यश मिळाले, त्यांच्याकडे पैसा देखील होता, मात्र पुन्हा एकदा 1999 मध्ये, अमिताभ यांची कंपनी अमिताभ बच्चन कॉर्पोरेशन लिमिटेड (ABCL) मोठ्या कर्जात बुडाली आहे.
अमिताभ बच्चन यांनी सांगितले की, जेव्हा ते मुंबईत आले तेव्हा त्यांना जाहिरातींमध्ये काम करण्याची ऑफर देण्यात आली होती, ज्यासाठी त्यांना 10 हजार रुपये मानधनही दिले जात होते, तेव्हा 1960 च्या दशकात खूप मोठी रक्कम होती. त्यावेळी ते रेडिओवर काम करून महिन्याला 500 रुपये कमवत असत. पण त्यांची जाहिरातीसाठी निवड झाली. त्यामुळे त्यांनी ती ऑफर नाकारली.
अमिताभ यांना वाटायचे की, पैशाच्या गरजेसाठी जाहिरातीची ऑफर घेतली तर पुढे त्यांना फिल्मी दुनियेत काम करता येणार नाही. कारण अभिनेता होण्यासाठी ते मुंबईत आले आणि त्याकडेच त्यांचे लक्ष होते. ते म्हणाले, मी ड्रायव्हिंग लायसन्स घेऊन मुंबईत आली होतो, बाकी माझ्या जवळ काही नव्हते. मी अभिनेता झालो नाही तर मी टॅक्सी चालवीन, मात्र माझा संपूर्ण हेतू अभिनयाचा होता.
त्यावेळी राहायला जागा नव्हती म्हणून अमिताभ बच्चन यांना मरीन ड्राईव्हच्या बेंचवर झोपून अनेक रात्री काढाव्या लागल्या. कारण कोणी मित्रांच्या घरीही जास्त काळ राहू शकत नाही. पण असे असूनही त्यावेळी जाहीरातीचे १० हजार रुपये नाकारणे हा त्यांचा मोठा निर्णय होता…