मुंबई (इंडिया दर्पण वृतसेवा) – बॉलिवूडचे ‘शहेनशाह’ अमिताभ बच्चन वयाच्या या टप्प्यावरही पूर्ण उत्साहात व्यस्त आहेत. इतकेच नव्हे बच्चन यांची चित्रपटसृष्टी बद्दलची आवड वाढत आहे आणि त्यांनी वेगवेगळ्या चित्रपट आणि पात्रांनी मने जिंकली याचा चाहत्यांना खूप आनंद आहे. त्याच वेळी आता अमिताभ यांच्या चाहत्यांसाठी एक चांगली माहिती समोर आली आहे. अमिताभ बच्चन लवकरच ‘बाहुबली’ स्टार प्रभाससोबत दिसणार आहेत. प्रभास आणि अमिताभ या दोघांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.
अभिनेते अमिताभ बच्चन यांनी सांगितले की, त्यांनी अभिनेता प्रभाससोबत सायन्स फिक्शन चित्रपटासाठी पहिला शॉट दिला आहे. अमिताभ यांनी आपल्या ट्विटमध्ये प्रभासचे एक प्रतिभावान आणि नम्र कलाकार असल्याचे वर्णन केले आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या ‘महानती’ चित्रपटाचे दिग्दर्शन करण्यासाठी ओळखले जाणारे चित्रपट निर्माते नाग अश्विन यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. सध्या या चित्रपटाचे नाव ‘प्रोजेक्ट के’ आहे. मात्र या नव्या चित्रपटाचे नाव अद्याप ठरलेले नसून ‘प्रोजेक्ट के’ असे म्हटले जात आहे.
या चित्रपटात दीपिका पदुकोणही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार असल्याचे सांगण्यात येत आहे. अमिताभ यांनी ट्विट करून ही माहिती दिली आणि चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान प्रभासकडून खूप काही शिकण्यास उत्सुक असल्याचे सांगितले. अमिताभ यांनी ट्विट केले की, ‘पहिला दिवस, पहिला शॉट. ‘बाहुबली’ हा प्रभाससोबतचा पहिला चित्रपट आणि त्याच्या आभा, त्याची प्रतिभा आणि त्याच्या विलक्षण नम्रतेने असा सन्मान मिळवणे. मी त्याच्याकडून खूप काही शिकण्यास उत्सुक आहे. तर दुसरीकडे, प्रभासने त्याच्या इंस्टाग्राम पेजवर अमिताभ बच्चन यांचा एक फोटो शेअर केला आणि सांगितले की, त्यांच्यासोबत काम करणे ‘स्वप्न पूर्ण होण्यासारखे आहे’.
https://twitter.com/SrBachchan/status/1494740796049956865?s=20&t=s0jvkMJX9Un3h37bbKDgBw