इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – संघर्ष सगळ्यांच्याच वाट्याला येतो. मात्र समुद्राच्या लाटांना न घाबरता प्रवाहाच्या विरुद्ध पोहून जात जो आपली ध्येय पूर्ण करतो, लोक त्याला कायम लक्षात ठेवतात. बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी देखील मोठा संघाचं करून बॉलीवूडमध्ये स्वतःला सिद्ध केले आहे. आज त्यांच्या नावाला वजन आहे. लोक अमिताभ याना एकेकाळी उंट म्हणायचे, हे तुम्हाला माहीत आहे का? ही गोष्ट स्वतः अमिताभ बच्चन यांनीच सांगितली आहे. अमिताभ बच्चन यांनी इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली. या फोटोसोबत त्यांनी एक पोस्ट लिहिली आहे आणि सांगितलं की मला एकेकाळी लोक उंट म्हणायचे. अमिताभ बच्चन यांच्या या पोस्टवर चाहते विविध प्रकारच्या कमेंट देत आहेत.
अमिताभ बच्चन यांनी इंस्टाग्रामवर एक पोस्ट केली आहे. त्यात अमिताभ बच्चन हे एका उंटावर बसले आहेत. हा एका सेटवरचा फोटो आहे, हे पोस्टवरून कळतंय. हा फोटो १९६९ चा असल्याचे अमिताभ यांनी सांगितले आहे. सिनेमा विश्वात आलो तेव्हा अनेक लोक मला ऊंट म्हणायचे. त्यानंतर मी ठरवलं की, मी हे खरं करून दाखवेन. मग मी एका ऊंटावर चढलो. हा फोटो माझा दुसरा सिनेमा ‘रेश्मा आणि शेरा’ या सिनेमातला आहे. हे ठिकाण जैसलमेरपासून खूप दूर पोचीना येथील आहे. आता बरं आहे की, मला कुणी ऊंट म्हणत नाही. यासोबत अमिताभ बच्चन यांनी काही फनी इमोजी केल्या आहेत. या पोस्टवर लोक अनेक कमेंट करत आहेत.
एक युजर म्हणाला लोकांनी तुम्हाला अगदी योग्य नाव दिलं होतं. कारण ऊंट वाळवंटात न थकता अनेक उंच उंच ठिकाणी जातो. त्याचप्रमाणे बॉलिवूडची अनेक उंच शिखरं तुम्ही गाठली आहेत. एक चाहता म्हणाला की, माझे काका दिलीप कुमार यांचे चाहते होते. ते तुम्हाला ऊंट म्हणायचे. त्यामुळे मी त्यांच्याशी वाद घालायचो. चाहत्यांच्या कमेंटमधून अनेक गमतीशीर गोष्टी समोर येत असल्या तरी सध्या या फोटोची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा आहे.
Big B Amitabh Bachchan on Old Photo Camel Taunt