इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – मेगास्टार अमिताभ बच्चन यांच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. हैदराबादमध्ये एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान बिग बी अमिताभ गंभीर जखमी झाले होते. अमिताभ हे ‘प्रोजेक्ट के’ चित्रपटासाठी अॅक्शन सीन शूट करत असताना ही घटना घडली. अपघातानंतर चित्रपटाचे शूटिंग थांबवण्यात आले. हैदराबादमधील उपचारानंतर अमिताभ हे मुंबईतील त्याच्या घरी परतले आहेत. सध्या चित्रपटाचे शूटिंग सध्या थांबवण्यात आले आहे. या सर्व घटनेची माहिती स्वतः बच्चन यांनी ब्लॉग लिहून दिली आहे. त्यांनी लिहिले आहे की त्यांना शरीरात तीव्र वेदना होत आहेत आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ते विश्रांती घेत आहेत.
अमिताभ बच्चन हैदराबादमध्ये ‘प्रोजेक्ट के’ चित्रपटाचे शूटिंग करत असताना ही घटना घडली. एका अॅक्शन सीनच्या शूटिंगदरम्यान बिग बींचा अपघात झाला. मेगास्टारने सांगितले की, अपघातादरम्यान बरगड्यांना आणि स्नायूंना गंभीर दुखापत झाली आहे. त्यानंतर हैदराबाद येथील एआयजी रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर ते मुंबईतील त्यांच्या घरी परतले आहेत. डॉक्टरांनी डिस्चार्ज दिला असला तरी अभिनेत्याला अजूनही खूप वेदना होत आहेत. आपल्या दुखापतीबद्दल माहिती देताना अमिताभ बच्चन म्हणाले की, हे खूप वेदनादायक आहे. चालणे आणि श्वास घेण्यात त्रास होत आहे. सामान्य स्थितीत येण्यासाठी काही आठवडे लागतील. डॉक्टरांनी वेदनेसाठी काही औषधही दिले आहेत.
अमिताभ बच्चन लिहितात की, परिस्थिती योग्य होईपर्यंत सर्व काम थांबवले आहे. चित्रपटाचे शूटिंग पुढे ढकलण्यात आले आहे. मी जलसा या बंगल्यात विश्रांती घेत आहे. जरी सामान्य दैनंदिन कामे स्वत: करू शकत असलो तरी पूर्णपणे तंदुरुस्त होण्यासाठी बराच वेळ लागणार आहे. तोपर्यंत आपल्या चाहत्यांना भेटू शकत नसल्याबद्दल मला दु:ख आहे. जलसा या बंगल्याच्या दारात येणाऱ्या चाहत्यांनी कृपया येऊ नये आणि इतर जे येण्याचा विचार करत आहेत त्यांनाही असे करू नका असे आवाहन अमिताभ यांनी केले आहे.
https://twitter.com/ANI/status/1632600767449432069?s=20
Big B Amitabh Bachchan Injured Film Shooting