विशेष प्रतिनिधी, मुंबई
प्रसिद्ध अभिनेते ‘बिग बी’ म्हणजे अमिताभ बच्चन हे हिंदी चित्रपटसृष्टीतील एक आगळेवेगळे व्यक्तिमत्त्व आहेत. गेल्या चार ते पाच दशकांपासून ते चित्रपटांसह विविध माध्यमांमध्ये यशस्वी कलाकार म्हणून कार्यरत आहेत. तसेच आपल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात ते नेहमी चर्चेत राहतात. अनेक रंजक किस्से ही त्यांच्या बद्दल सांगितले जातात. बिग बी अमिताभ बच्चन यांनी आपल्या मोबाईलमध्ये पत्नी जया बच्चन यांचा मोबाईल नंबर कोणत्या नावाने सेव्ह केला आहे, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. हेच आज आपण जाणून घेणार आहोत.
अमिताभ बच्चन यांनी चित्रपटसृष्टीत स्थान मिळवण्याबरोबरच त्यांनी आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्याही अतिशय चांगल्या प्रकारे पार पाडल्या. दुसरीकडे, जया बच्चन आणि अमिताभ यांची जोडी बॉलीवूडमधील सर्वात लोकप्रिय जोडप्यांपैकी एक मानली जाते. त्या दोघांनी एकत्रितपणे ४८ वर्षे एकमेकांना पाठिंबा दर्शविला आणि साथ दिली. त्याचवेळी बिग बी हे लोकांसोबत बोलताना आपल्या पत्नीबद्दल बर्याचदा किस्से सांगताना दिसतात. इतकेच नाही तर लोकही या दोघांबद्दल अधिकाधिक जाणून घेण्यास उत्सुक असतात.
एकदा, बिग बीने एका शुटींगच्या सेटवर जयाबद्दल एक किस्सा शेअर केला होता, तो आजही चर्चेत आहे. त्यावेळी त्यांनी मोबाईलमध्ये पत्नीचा नंबर कोणत्या नावाने सेव्ह केला आहे हे देखील सांगितले. मी माझ्या मोबाईलमध्ये माझ्या पत्नीचे नावही वेगळ्या प्रकारे सेव्ह केले. म्हणजेच जया यांचा नंबर ‘जेबी’ या नावाने सेव्ह केला आहे, असे अमिताभ यांनी सांगितले.