नाशिक – मखमलाबाद शिवारातील धात्रक मळा परिसरात असलेल्या एका तुंडूब भरलेल्या विहिरीत आज दुपारी एक बिबट्या मृतावस्थेत स्थानिक शेतकऱ्यांना आढळून आला. यावेळी त्यांनी तात्काळ वनविभागाला माहिती कळवली. त्यानंतर वन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी बिबट्याचा मृतदेह सुरक्षितपणे विहिरीतून बाहेर काढला. त्यानंतर मृतदेहाचे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी रोपवाटिकेत शवविच्छेदन करून अंत्यसंस्कार केले. मृत बिबट्या हा मादी असून सुमारे अंदाजित तीन वर्षे वयाचा असल्याचे समजते.