नाशिक – नाशिकरोड परिसार जय भवानी रोड परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाचे कर्मचारी उपनगर पोलीस स्टेशन व स्थानिक नागरिक यांच्या मदतीने यश आले आहे. तब्बल सात तासानंतर बिबट्या सापळयात सापडल्यानंतर नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. आज सकाळी सहा वाजेच्या सुमारास जय भवानी रोड येथील उद्यानात बिबट्याने दर्शन झाले. त्यानंतर नागरिकांमध्ये घबरात निर्माण झाली होती. पण, अवघ्या सात तासात वनविभागाचे कर्मचारी उपनगर पोलीस व स्थानिक नागरिक यांनी रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले. यात चारही बाजूने जाळ्या टाकून बिबट्याला बेशुद्ध होणारे इंजेक्शन दिले. त्यामुळे बिबट्याला जेरबंद झाला. जेरबंद झाल्यानंतर बिबट्याला बघण्यासाठी प्रचंड गर्दी जमली.
पंकज गर्ग वरिष्ठ आयएएस वनाधिकारी, सहायक वन संरक्षक गणेश झोले वन अधिकारी विवेक बदाने, अनिल अहिरराव
देशपांडे अधिकारी आणि कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. स्थानिक एनजीओ, इको इको यांनी सहकार्य केले. पोलिस उपायुक्त विजय खरात साहाय्यक पोलीस आयुक्त सिद्धेश्वर धुमाळ उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीलेश माईनक आदी उपस्थित होते.
असा होता वावर
जय भवानी रोड येथील शिवसेनेचे कार्यकर्ते राजेंद्र गायकवाड यांच्या बंगल्याच्या पाठीमागे असलेल्या उद्यानात बिबट्याने दर्शन सकाळी झाले. त्यानंतर बिबट्या हा फर्नाडिस वाडी येथे राहणारे सुनील बहन वाल यांच्या घरात घुसला. त्यानंतर के जे मेहता हायस्कूल परिसरात असलेल्या एका बंगल्याच्या आवारात असलेल्या गाडीखाली लपला. त्यानंतर एका बंगल्याच्या हा बारात चालत गेला. त्यात क्षत्रिय नावाच्या एका इसमावर हल्ला केला. एका बंगल्यातून दुसऱ्या बंगल्यात उड्या मारत होता. त्यानंतर अॅड. सोमनाथ गायकवाड यांच्या बंगल्यातील आवारात असलेल्या मारुती सुझुकी गाडी खाली लपला. संगीता गायकवाड यांच्यावरील सदर बिबट्याने झडप मारण्याचा प्रयत्न केला. पण, त्या बचावल्या.